Home /News /coronavirus-latest-news /

Covid 19: युरोपच्या वाटेवर भारत, लसीकरणाचा वेग मंदावला; वाढवली तिसऱ्या लाटेची शक्यता

Covid 19: युरोपच्या वाटेवर भारत, लसीकरणाचा वेग मंदावला; वाढवली तिसऱ्या लाटेची शक्यता

कोविड-19 (Covid-19) विरुद्ध लसीकरणाबाबत घोषित केलेला कालावधी पूर्ण होण्यास फारच कमी वेळ शिल्लक आहे.

    नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर: कोरोना व्हायरस (Corona Virus) अद्याप पूर्णतः गेला नाही. काही देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकं वर काढलं आहे. त्यातच डिसेंबर महिना अगदी तोंडावर आला आहे आणि सरकारने कोविड-19 (Covid-19) विरुद्ध लसीकरणाबाबत घोषित केलेला कालावधी पूर्ण होण्यास फारच कमी वेळ शिल्लक आहे. सरकारनं म्हटलं होतं की, या वर्षांच्या अखेरीस भारतातील प्रौढ लोकसंख्येचं (India’s Adult Population)लसीकरण पूर्ण केलं जाईल. मात्र राज्यांमधील लसीच्या साठ्यानं (Vaccine Stock)चिंता वाढवली आहे. लसीकरण मोहीम सुरू झाल्यानंतर 300 दिवसांनंतर, 80 टक्के लोकसंख्येला पहिला डोस मिळाला आहे. जो दुसऱ्या डोसच्या बाबतीतली ही संख्या 40 टक्के आहे. मात्र दुसरीकडे युरोप आणि मध्य आशियातील परिस्थिती पाहता भविष्यातील सुरक्षा संकटात सापडल्याचं चित्र दिसत आहे. दोन्ही देशांमध्ये कोविड-19 च्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा वाढ नोंदवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, युरोप आणि मध्य आशियातील प्रत्येक देश कोविडच्या नवीन धोक्याचा सामना करत आहे. WHO ने याचे कारण अपुरे लसीकरण आणि उपायांमध्ये हलगर्जीपणा असल्याचं दिलं आहे. भारतात अद्याप प्रकरणांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, मात्र इतर दोन परिस्थिती कायम आहेत. हेही वाचा- निशब्द!  अफगाणिस्तानातील परिस्थिती, 20 दिवसांच्या मुलींना लग्नाची ऑफर  भारतात लसीकरण मोहीम 16 जानेवारी रोजी सुरू झाली आणि 1 मे पासून 18+ वयोगटासाठी लसीकरण सुरू झाले. शुक्रवारी लसीकरण मोहिमेला 301 दिवस पूर्ण झाले असून देशात 111 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये लसीकरणाचा वेग वेगवान होता, मात्र ऑक्टोबरमध्ये त्यात घट दिसून आली. सुरुवातीला अनेक कारणांमुळे लसीकरण संथ होते, मात्र जूनमध्ये परिस्थिती चांगली झाली. जूनमध्ये या लसीचे 12 कोटी डोस देण्यात आले. जुलैमध्ये हा आकडा 13.45 कोटींवर पोहोचला होता. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ऑगस्टमध्ये डोसची संख्या 18.38 कोटी, सप्टेंबरमध्ये 23.60 कोटी, ऑक्टोबरमध्ये 17.29 कोटी होती. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देशातील एकूण लसीकरणांपैकी 40 टक्के लसीकरणाची नोंद झाली आहे. ही अशी वेळ होती जेव्हा देशात कोरोनाची तिसर्‍या लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हेही वाचा- T20 World Cup: ICU मधून मैदानात उतरलेल्या रिझवाननं भारतीय व्यक्तीला दिलं खास गिफ्ट सणासुदीच्या मध्यावर लसीकरणावर परिणाम झाला आहे. गेल्या काही आठवड्यात, न वापरलेल्या लसींची संख्या झपाट्यानं वाढली आहे. सरकारने आतापर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना 121 कोटी डोस दिले आहेत. शुक्रवारी न वापरलेल्या डोसची संख्या 18.04 कोटी होती. 1 नोव्हेंबर रोजी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडे 13 कोटींहून अधिक लसी शिल्लक होत्या. 15 ऑक्टोबर रोजी हा आकडा केवळ 10.53 कोटी इतका होता. तर ऑक्टोबर 2016 मध्ये न वापरलेल्या डोसची संख्या केवळ 5 कोटी होती. हेही वाचा- आता दहशतवाद्याला बसेल चाप! जम्मू काश्मीरमध्ये लागले CCTV या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण कमी होत असलेल्या जिल्ह्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्या जिल्ह्यांनी बैठकीला हजेरी लावली होती, जेथे पहिल्या डोसचे लसीकरण कव्हरेज 50 टक्क्यांपेक्षा कमी होते आणि दुसऱ्या डोसच्या बाबतीतही ही आकडेवारी खूपच कमी होती. पंतप्रधान मोदींनी झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि मेघालयातील 40 जिल्ह्यांतील जिल्हा दंडाधिकार्‍यांशी चर्चा केली. त्या वेळी पंतप्रधानांनी घरोघरी जाऊन लसीकरण करण्यावर भर दिला होता. त्यांनी 'हर घर दस्तक' असं म्हटलं होतं. लसीकरण मोहीम लोकांच्या घरोघरी नेण्यासाठी हे पाऊल असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं. आता काही देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे, तेव्हा ही महामारी संपलेली नाही हे समजून घेण्याची वेळ आली आहे. संक्रमणाची दुसरी घातक लाट टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे हे नागरिकांना समजले पाहिजे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Corona updates, Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus, Coronavirus cases

    पुढील बातम्या