मराठी बातम्या /बातम्या /देश /

दहशतवाद थांबेल! खोऱ्यातल्या प्रत्येक नाक्यावर राहणार नजर; किश्तवाड शहरात लागले CCTV

दहशतवाद थांबेल! खोऱ्यातल्या प्रत्येक नाक्यावर राहणार नजर; किश्तवाड शहरात लागले CCTV

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आता दहशतवाद्यांच्या हालचालींवर चाप बसणार आहे.

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आता दहशतवाद्यांच्या हालचालींवर चाप बसणार आहे.

जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आता दहशतवाद्यांच्या हालचालींवर चाप बसणार आहे.

  • Published by:  Pooja Vichare
श्रीनगर, 13 नोव्हेंबर: एक चांगली बातमी समोर येतेय. जम्मू काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) आता दहशतवाद्यांच्या हालचालींवर चाप बसणार आहे. किश्तवाड शहर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या (CCTV camera surveillance) देखरेखीसह पूर्णपणे सुसज्ज झाला असल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir Police) दिली आहे. यामुळे कोणत्याही घटनेनंतर कोणताही गुन्हेगार पळून जाऊ शकत नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र, काही काळासाठी दहशतवादाविरोधात सुरक्षा दलांनाही मोठे यश मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. किश्तवाडचे पोलीस उपअधीक्षक (DCP) सतेश कुमार म्हणाले की, सामान्य नागरिकांच्या संमतीनं सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. आम्ही आत्मविश्वासाने सांगू शकतो की संपूर्ण किश्तवाड शहर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आहे. कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यात किंवा चोरीच्या गुन्ह्यात कोणी सापडला तर तो पोलिसांच्या नजरेतून सुटू शकणार नाही. हेही वाचा- T20 World Cup: पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर होताच हसन अलीचा Dance Viral, पाहा VIDEO गेल्या महिन्यात, 20 ऑक्टोबर रोजी सुरक्षा दलांनी किश्तवाड जिल्ह्यात एका व्यक्तीला ग्रेनेडसह अटक करून दहशतवादी कट हाणून पाडला. दोडा जिल्ह्यातील सोहेल अहमद भट असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याचवेळी, सप्टेंबर महिन्यात पोलिसांनी या जिल्ह्यातून अनेक पूर्व दहशतवाद्यांना अटक केली होती. 25 सप्टेंबर रोजी हिजबुल मुजाहिद्दीनच्या पूर्व दहशतवाद्याला 19 वर्षांच्या शोधानंतर किश्तवाडमध्ये अटक करण्यात आली होती. पोलिसांनी माहिती दिली होती की, रियासीमधील अर्नास येथील रहिवासी असलेला दुल्ला उर्फ ​​'जमील' हा तिसरा पूर्व दहशतवादी आहे, ज्याला गेल्या 11 दिवसांपूर्वी किश्तवाडमध्ये पोलिसांनी अटक केली होती. दुल्ला हा चतरू परिसरातील कुंडवार गावात राहत होता. जम्मू-काश्मीरमध्ये 38 पाकिस्तानी दहशतवादी हजर, यादी तयार सुरक्षा यंत्रणांनी (Security Agencies) खोऱ्यात असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. हे दहशतवादी काश्मीर खोऱ्यातील तरुणांना त्यांच्या संघटनांमध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. हे दहशतवादी तरुणांचं माइंड वॉश करुन सुरक्षा दल आणि सर्वसामान्यांना मारत आहेत. मात्र आता सुरक्षा दलांनी यादी तयार करून त्यांच्यावर मोठ्या कारवाईची तयारी केली आहे. हेही वाचा- शोएबकडून मिळत असलेल्या वागणुकीबद्दल सानियानं मांडली व्यथा, पाहा VIDEO गुप्तचर विभागाच्या रिपोर्टनुसार, सध्या काश्मीरमध्ये 38 पाकिस्तानी दहशतवादी आहेत. यामध्ये लष्करचे 27 तर जैशचे 11 दहशतवादी आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दहशतवादी खोऱ्यात वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले आहेत. तेथून ते हे हल्ले घडवत आहेत. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीनगरमध्ये 4, कुलगाममध्ये 3, पुलवामामध्ये 10, बारामुल्लामध्ये 10 आणि काश्मीरच्या विविध भागात 11 दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे.
First published:

Tags: Jammu and kashmir

पुढील बातम्या