मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup: ICU मधून मैदानात उतरलेल्या रिझवाननं भारतीय व्यक्तीला दिलं खास गिफ्ट

T20 World Cup: ICU मधून मैदानात उतरलेल्या रिझवाननं भारतीय व्यक्तीला दिलं खास गिफ्ट

T20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा (Pakistan vs Australia) पराभव केला. पाकिस्तानच्या या पराभवानंतरही त्यांचा विकेट किपर-बॅटर मोहम्मद रिझवानची (Mohammad Rizwan) सर्व जण प्रशंसा करत आहेत.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

दुबई, 13 नोव्हेंबर: T20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup 2021) सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा (Pakistan vs Australia) पराभव केला. पाकिस्तानच्या या पराभवानंतरही त्यांचा विकेट किपर-बॅटर मोहम्मद रिझवानची (Mohammad Rizwan) सर्व जण प्रशंसा करत आहेत. याचं कारणही खास आहे. रिझवान सेमी फायनलपूर्वी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता. आयसीयूमधून थेट क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या रिझवाननं ऑस्ट्रेलिया विरुद्ध 52 बॉलमध्ये 67 रनची खेळी केली होती.

'खलीज टाईम्स' च्या वृत्तानुसार श्वास घेण्यात त्रास होत असल्यानं रिझवान दुबईतील मेदोर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत  होता. हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असतानाही त्याला सेमी फायनल खेळण्याचे वेध लागले होते. त्यावेळी भारतीय डॉक्टर्सनं त्याच्यावर उपचार केले. शाहीर सैनलबदीन असं या भारतीय डॉक्टरचं नाव आहे. या उपचाराबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी रिझवाननं त्याची जर्सी स्वाक्षरी करून डॉक्टर सैनलबदीन यांना भेट म्हणून दिली आहे.

मोहम्मद रिझवानच्या या जिगरबाज वृत्तीचं डॉक्टरांनी देखील कौतुक केलं आहे. रिझवान हॉस्पिटलमधून थेट मैदानात उतरला. त्यानं मैदान गाजवलं. पण, त्याचं अर्धशतक व्यर्थ ठरलं. ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानचा 5 विकेट्सनं पराभव करत 2009 नंतर टी20 वर्ल्ड कप जिंकण्याचं पाकिस्तानचं स्वप्न धुळीस मिळवलं.

पाकिस्ताननं पहिल्यांदा बॅटींग करत 4 आऊट 176 रन काढले होते. 177 रनचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. कॅप्टन फिंच पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यानंतरही ठराविक अंतरानं ऑस्ट्रेलियाच्या विकेट्स पडत होत्या. शेवटच्या दोन ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाला (Australia vs Pakistan) विजयासाठी 22 रनची गरज होती, तेव्हा मॅथ्यू वेडने (Mathew Wade) शाहिन आफ्रिदीला लागोपाठ तीन सिक्स मारत एक ओव्हर शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलियाला जिंकवलं. मॅथ्यू वेडने 17 बॉलमध्ये 41 रन केले, यामध्ये 4 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. मार्कस स्टॉयनिसने (Marcus Stoinis) 31 बॉलमध्ये 40 रनची खेळी केली.

पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर होताच हसन अलीचा Dance Viral, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाची फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध (Australia vs New Zealand Final) होणार आहे. ऑस्ट्रेलियाची टीम यापूर्वी 2010 साली फायनलमध्ये पोहचली होती. पण, त्यावेळी इंग्लंडनं त्यांना पराभूत केले होते. तर, न्यूझीलंडची टीम टी20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच फायनलमध्ये दाखल झाली आहे. त्यामुळे रविवारी दुबईत होणाऱ्या मॅचमध्ये कोणतीही टीम जिंकली तरी नवा चॅम्पियन मिळणार आहे.

First published:

Tags: Australia, Pakistan, T20 world cup