मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

अफगाणिस्तानात 20 दिवसांच्या मुलींचं लग्न, हुंड्यामुळे दिली जातेय लग्नाची ऑफर

अफगाणिस्तानात 20 दिवसांच्या मुलींचं लग्न, हुंड्यामुळे दिली जातेय लग्नाची ऑफर

काही दिवसांच्या मुलींना हुंड्यात पैसे घेण्याच्या बदल्यात भविष्यात लग्न करण्याची ऑफर दिली जात असल्याचं 'विश्वासार्ह अहवाल' समोर आला आहे.

काही दिवसांच्या मुलींना हुंड्यात पैसे घेण्याच्या बदल्यात भविष्यात लग्न करण्याची ऑफर दिली जात असल्याचं 'विश्वासार्ह अहवाल' समोर आला आहे.

काही दिवसांच्या मुलींना हुंड्यात पैसे घेण्याच्या बदल्यात भविष्यात लग्न करण्याची ऑफर दिली जात असल्याचं 'विश्वासार्ह अहवाल' समोर आला आहे.

  • Published by:  Pooja Vichare
काबूल, 13 नोव्हेंबर: Afghanistan Child Marriages: अफगाणिस्तानावर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर तेथे महिला आणि मुलींचं भविष्य अंधारात गेलं आहे. हे गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. आता अफगाणिस्तातून (Worst Situation in Afghanistan) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तानातील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की 20 दिवसांच्या मुलींना लग्नासाठी ऑफर केलं जात आहे. युनिसेफ ( United Nations Children's Fund) नं सांगितले की, काही दिवसांच्या मुलींना हुंड्यात पैसे घेण्याच्या बदल्यात भविष्यात लग्न करण्याची ऑफर दिली जात असल्याचं 'विश्वासार्ह अहवाल' समोर आला आहे. एजन्सीने आपल्या डेटामध्ये म्हटलं आहे की, अफगाणिस्तानमध्ये 28 टक्के मुलींचं लग्न 15 वर्षांआधीच आणि 49 टक्के मुलींचं (Baby Girls Marriage)लग्न 18 वर्ष पूर्ण होण्याआधीच केलं जात आहे. देशाच्या राजकीय अस्थिरतेपूर्वीच, 2018 आणि 2019 मध्ये केवळ हेरात आणि बगदीस प्रांतात 183 बालविवाह झाले आहेत आणि हजारो मुलांची विक्री झाली आहे. विक्री गेलेल्या मुलांचं वय सहा महिने ते 17 वर्षांपर्यंत आहे. युनिसेफच्या कार्यकारी संचालक हेन्रिएटा फोर यांनी सांगितलं की, या अहवालांमुळे गोष्टी खूप चिंतित आहे. देशातील गरीब लोकसंख्येची संख्या वाढली हेनरीटा फोरे म्हणाल्या, 'आम्हाला विश्वासार्ह अहवाल मिळाले आहेत की कुटुंबे हुंड्याच्या बदल्यात भविष्यात लग्नासाठी 20 दिवसांपर्यंतच्या मुलींना देऊ करत आहेत. कुटुंबांना हताश जीवन जगावे लागत आहे. कोरोना व्हायरसच्या काळात देशात मानवतावादी संकट (Humanitarian Crisis) निर्माण झालं असून हिवाळाही जवळ आला आहे. 2020 मध्ये, अफगाणिस्तानची अर्धी लोकसंख्या आधीच गरीब होती आणि त्यांना स्वच्छ पाणी आणि पौष्टिक अन्न देखील उपलब्ध नाही. पण आता आर्थिक परिस्थितीमुळे जास्त लोक दारिद्र्यात जात आहेत. यामुळे त्यांना पैशासाठी इतर मार्गांचा अवलंब करावा लागतो. लोक मुलांना काम करायला लावतात. लहान वयातच मुलींची लग्नं केली जात आहेत. हेही वाचा- अटक करण्यात आलेल्या 'त्या' 83 आरोपींना सरकार करणार 2 लाखांची मदत तालिबानने शिक्षणावर घातली बंदी तालिबानने मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली असून त्यामुळे परिस्थिती आणखीनच धोकादायक बनली आहे. फोर म्हणतात, शिक्षण हे बालविवाह आणि बालमजुरी (Child Labour) यांसारख्या नकारात्मक यंत्रणेपासून अनेकदा सर्वोत्तम संरक्षण आहे. त्या म्हणाल्या की, बालविवाहामुळे आयुष्यभर दुःख होऊ शकते. हेही वाचा- T20 World Cup: ICU मधून मैदानात उतरलेल्या रिझवाननं भारतीय व्यक्तीला दिलं खास गिफ्ट  युनिसेफने म्हटलं की, ज्या मुलींचं वय 18 वर्षांपूर्वी लग्न झालं आहे. त्यांची शाळेत (Afghanistan Girl Education)जाण्याची शक्यता कमी असते आणि त्यांना घरगुती हिंसाचार, भेदभाव, अत्याचार आणि खराब मानसिक आरोग्य अनुभवण्याची शक्यता आहे. ती तरुण वयात गर्भवती होते. बाळंतपणातील गुंतागुंतीमुळे मुलींचा जीव धोक्यात येतो. युनिसेफने उपासमार, बालमजुरी आणि बालविवाहाच्या जोखमींचे निराकरण करण्याच्या उद्देशानं रोख सहाय्य कार्यक्रम सुरू केला आहे. मात्र हे उपाय पुरेसे नाहीत अशी भीती वाटते.
First published:

Tags: Afghanistan, Kabul, Taliban

पुढील बातम्या