मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Coronavirus कधी जाणारच नाही का? स्टडीतून मोठा खुलासा, आणखी वाढणार चिंता! 

Coronavirus कधी जाणारच नाही का? स्टडीतून मोठा खुलासा, आणखी वाढणार चिंता! 

एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे, की हा विषाणू (Coronavirus) कधीच संपणार नाही. म्हणजेच हा कायम जिवंत राहिल. मेडिकल सायन्सचं (Medical Science) असं म्हणणं आहे, की कोणत्याही विषाणूचं अस्तित्व कधीच संपत नाही.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 08 मे : कोरोनानं (Coronavirus) देशभरात अक्षरशः थैमान घातलं आहे. याचा सर्वच गोष्टींवर मोठा परिणाम झाला आहे. या कठीण काळातून बाहेर येण्यासाठी लोकं वाट पाहात असतानाच आता नुकतंच समोर आलेली एक स्टडी चिंतेत भर घालणारी आहे. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, की आता आपल्याला कोरोनासोबतच जगण्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे, की हा विषाणू (Virus) कधीच संपणार नाही. म्हणजेच हा कायम जिवंत राहिल. याचा प्रकोप दिर्घकाळापर्यंत कायम राहाणार आहे.

मेडिकल सायन्सचं (Medical Science) असं म्हणणं आहे, की कोणत्याही विषाणूचं अस्तित्व कधीच संपत नाही. या संशोधनात असं म्हटलं गेलं आहे, की कोरोना विषाणू वर्षभरात एकदा आपल्या उच्चांकावर असेल. यामुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागेल. भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. अशातच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार नाही; केंद्र सरकारचा दावा

जर्मनीच्या हेडलबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ आणि चायनीज अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सनं कोरोना कायम जिवंत राहाणार असल्याचा दावा केला आहे. या संशोधनाचा अहवाल जनरल साइन्टिफिकमध्येही प्रकाशित केला गेला आहे. या रिपोर्टमध्ये विषाणू दिर्घकाळ राहाणार असल्याच्या दाव्यासोबत इतरही अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.

कोरोनापासून बचावासाठी भाजप आमदारानं सांगितला उपाय, गोमूत्र पितानाचा VIDEO शेअर

या रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे, की जगातील उत्तर आणि दक्षिणेकडील देशांमध्ये कोरोनाचा कहर अधिक असेल. सोबतच उन्हाळा, प्रचंड उष्णता किंवा थंडी, यापैकी कोणत्याही स्थितीमध्ये कोरोनाचा प्रकोप कमी होणार नाही किंवा या वातावरणाचा कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात काहीच उपयोग होणार नाही. संशोधकांनी हा अहवाल 117 देशांमधील आकड्यांच्या आधारावर तयार केला आहे. सशोधकांचं असं म्हणणं आहे, की कोरोनापासून स्वतःचा बचाव हाच एकमेव पर्याय आहे. यासाठी लसीकरणानंतरही कोरोनापासून बचावासाठी करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Corona updates, Coronavirus