जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / कोरोनापासून बचावासाठी भाजप आमदारानं सांगितला अजब उपाय, गोमूत्र पितानाचा VIDEO केला शेअर

कोरोनापासून बचावासाठी भाजप आमदारानं सांगितला अजब उपाय, गोमूत्र पितानाचा VIDEO केला शेअर

कोरोनापासून बचावासाठी भाजप आमदारानं सांगितला अजब उपाय, गोमूत्र पितानाचा VIDEO केला शेअर

भाजप आमदार सुरेंद्र सिंह (BJP MLA surendra singh) यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी गोमूत्र पितानाचा स्वतःचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ 08 मे : देशभरात कोरोनानं (Coronavirus) अक्षरशः थैमान घातलं आहे. या परिस्थितीमध्ये अनेक ठिकाणी औषधांचा आणि आवश्यक इंजेक्शनचा तुटवडा (Shortage of Medicines) जाणवत आहे. अशात आता उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बलियाच्या बैरिया विधानसभेचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह (BJP MLA surendra singh) यांनी कोरोनापासून बचाव करण्यासाठी गोमूत्र पिण्याचा सल्ला दिला आहे. इतकंच नाही तर त्यांनी गोमूत्र पितानाचा स्वतःचा व्हिडिओदेखील (Video) शेअर केला आहे. आमदार सुरेंद्र सिंह अनेकदा आपल्या भलत्याच विधानांमुळे आणि कामांमुळे चर्चेत असतात. अशात शुक्रवारी त्यांनी आपला आणखी एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओच्या माध्यमातून ते लोकांना गोमूत्र पिण्याचा सल्ला देत आहेत. त्यांनी सांगितलं, की मी रोज गोमूत्र पितो त्यामुळेच निरोगी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी ब्रश केल्यानंतर काहीही न खाता ठंड पाण्यात 5 झाकण गोमूत्र मिसळून प्यावं आणि यानंतर अर्धा तास काहीच खाऊ नये. असं केल्यास कोरोनाच नाही तर कोणताच आजार तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर वैद्यकीय उपचारांपेक्षाही हा पर्याय उत्तम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुरेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीच्या काळात विज्ञानही फेल ठरलं आहे. अशात या गोमूत्रानं त्यांना अजूनही सुरक्षित ठेवलं आहे. दिवसभर बाहेर फिरुन आणि सतत लोकांमध्येही राहूनही आपल्याला काहीच न झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

जाहिरात

सुरेंद्र सिंह यांचा असा दावा आहे, की दररोज गोमूत्र पिल्यामुळे त्यांना अजूनही कोरोना झालेला नाही. ते म्हणाले, की जगालादेखील ही गोष्ट समजायला हवी की गोमूत्राचं सेवन करुन कोरोना आटोक्यात आणणं शक्य आहे. इतकंच नाही तर त्यांनी असंही म्हटलं, की कोरोनात अनेकजणांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू होत आहे. गोमूत्राचं सेवन करुन यातून बचाव करता येऊ शकतो. सुरेंद्र सिंह म्हणाले, खोकला आणि तापापासून वाचण्यासाठी त्यांनी गायीच्या तुपात हल्दीची पावडर मिसळून ठेवली आहे. जेव्हा जेव्हा ते बाहेर दौऱ्यावर जातात तेव्हा सगळीकडेच फिल्टरचं पाणी मिळत नाही. अशात कुठेही पाणी पिल्यानंतर हे मिश्रण तोंडात टाकल्यास तुम्ही सुरक्षित राहाल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात