मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Covaxin ला WHO ची मंजुरी मिळण्यासाठी एवढा उशीर का? काय आहेत यामागचे निकष?

Covaxin ला WHO ची मंजुरी मिळण्यासाठी एवढा उशीर का? काय आहेत यामागचे निकष?

जागतिक आरोग्य संघटनेनं आतापर्यंत बहुतांश सर्व लशींना मंजुरी दिली आहे; मात्र भारतानं विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन (Why WHO is not approving covaxin?) या स्वदेशी लशीला अद्याप मान्यता दिलेली नाही. वाचा काय आहे कारण

जागतिक आरोग्य संघटनेनं आतापर्यंत बहुतांश सर्व लशींना मंजुरी दिली आहे; मात्र भारतानं विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन (Why WHO is not approving covaxin?) या स्वदेशी लशीला अद्याप मान्यता दिलेली नाही. वाचा काय आहे कारण

जागतिक आरोग्य संघटनेनं आतापर्यंत बहुतांश सर्व लशींना मंजुरी दिली आहे; मात्र भारतानं विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन (Why WHO is not approving covaxin?) या स्वदेशी लशीला अद्याप मान्यता दिलेली नाही. वाचा काय आहे कारण

    नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर: सध्या जगभरात सर्वत्र कोरोना विषाणूला (Coronavirus Latest Update) प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहीम (Vaccination Drive) राबवण्यात येत आहे. अमेरिकेसह रशिया, चीन आणि भारतानं लस निर्माण केली असून, भारतात इतर देशांनी विकसित केलेल्या लशींचं उत्पादनही केलं जात आहे. लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या लशींना जागतिक आरोग्य संघटनेची 'डब्ल्यूएचओ'ची (WHO) परवानगी मिळणं गरजेचं असतं. जागतिक आरोग्य संघटनेनं आतापर्यंत बहुतांश सर्व लशींना मंजुरी दिली आहे; मात्र भारतानं विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन (Why WHO is not approving covaxin?) या स्वदेशी लशीला अद्याप मान्यता दिलेली नाही.

    या लशीला मंजुरी देण्यासाठी मंगळवारी (26 ऑक्टोबर) जागतिक आरोग्य संघटनेची जीनिव्हामध्ये बैठक झाली; पण त्यातही या लशीला मंजुरी मिळाली नाही. या लशीचं अंतिम मूल्यांकन करणं आवश्यक असल्याचं डब्ल्यूएचओनं म्हटलं असून, या लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेक (WHO on Bharat Biotech covaxin) या भारतीय कंपनीकडून याबाबत अतिरिक्त स्पष्टीकरण मागण्यात आलं आहे. आता या संदर्भात डब्ल्यूएचओच्या तांत्रिक सल्लागार गटाची पुढील बैठक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या लशीला मान्यता मिळायला इतका वेळ लागण्याचं नेमकं कारण काय आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    हे वाचा-Sputnik V लस घेतल्यावर HIV होण्याची शक्यता? या देशाने घातली Vaccine वर बंदी

    सहा महिन्यापासून मंजुरीसाठी प्रतीक्षा

    इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने हैदराबादमधल्या भारत बायोटेक या कंपनीने कोवॅक्सिन ही स्वदेशी लस विकसित केली आहे. या वर्षी 19 एप्रिल रोजी, भारत बायोटेकने आपत्कालीन वापराच्या यादीत (EUL) लशीचा समावेश करण्यासाठी डब्ल्यूएचओकडे अर्ज सादर केला. यानंतर डब्ल्यूएचओने भारत बायोटेककडून अनेक प्रकारची माहिती मागवली. मंगळवारी डब्ल्यूएचओच्या तांत्रिक सल्लागार गटाने लशीबाबतच्या आकडेवारीचं विश्लेषण करण्यासाठी बैठक घेतली. यानंतर डब्ल्यूएचओने सांगितलं, की लशीचा जागतिक वापर लक्षात घेता तिचे फायदे आणि जोखीम याबाबत मूल्यांकन करणं आवश्यक आहे. त्यासाठी निर्मात्यांकडून अतिरिक्त स्पष्टीकरण मागणं आवश्यक असल्याचं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे.

    हे वाचा-पुन्हा चीनमध्ये कोरोनाच्या हाहाकाराला सुरुवात!ब्रिटनमध्ये 'या' व्हेरिएंटचा हल्ला

    काय आहे WHO चं म्हणणं?

    लशीच्या वापरासाठी परवानगी देण्याच्या निर्णयासाठी लशीचं पूर्ण मूल्यांकन आणि शिफारस करण्याची प्रक्रिया यासाठी काही वेळा प्रदीर्घ काळ लागतो. कारण जगाला योग्य सल्ला मिळणं आवश्यक आहे, असं डब्ल्यूएचओच्या आरोग्य आपत्कालीन कार्यक्रमाचे कार्यकारी संचालक डॉ. माइक रायन यांनी सांगितलं. जागतिक स्तरावर कोणत्याही उत्पादनाची शिफारस करण्यापूर्वी आम्ही उच्च पातळीच्या मानकांचं पालन करतो. लशीचा संबंध असतो तेव्हा सर्वप्रथम लस उत्पादकाला मंजुरीसाठी आवश्यक असलेली संपूर्ण कागदपत्रं सोपवावी लागतात. यामध्ये लशीची परिणामकारकता आणि निर्मिती प्रक्रियेची संपूर्ण माहिती असावी लागते. यासाठी अनेकवेळा डब्ल्यूएचओची टीम कंपनीच्या उत्पादन प्रकल्पाला भेट देते. यानंतर, सर्व गोष्टींचा समावेश करून एक डॉजियर तयार केला जातो. त्या डॉजियरवरच सल्लागार गट निर्णय घेतो, असंही डॉ. रायन यांनी स्पष्ट केलं.

    हे वाचा-भारतीय डॉक्टर कोविड-19 लसीचे बूस्टर शॉट्स का घेत आहेत

    डब्ल्यूएचओ प्रत्येक बारीकसारीक गोष्टीची बारकाईने खात्री करते. आम्ही प्रत्येक डेटाचा, उत्पादनाच्या संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास करतो. त्यानंतरच आम्ही ठामपणे जगाला खात्री देतो, की आम्ही सुचवलेलं उत्पादन तुमच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. लस मंजूर करण्यास विलंब होत असल्यानं बरेच जण नाराज होत असतील; पण डब्ल्यूएचओ गुणवत्तेशी (Quality) तडजोड करू शकत नाही. मंजुरीची वेळ उत्पादक कंपनीने प्रदान केलेल्या डेटावर अवलंबून असते. कंपनीने सर्व डेटा (Data) जलद उपलब्ध करून दिला, तर मंजुरीसाठी वेळ कमी लागतो, असंही डॉ. रायन यांनी नमूद केलं.

    'घाईगडबडीत निर्णय घेऊ शकत नाही'

    याबाबत डब्ल्यूएचओने एक ट्वीट केलं असून, या लशीबाबत अतिरिक्त माहिती मिळण्याची अपेक्षा आहे, असं म्हटलं आहे. 'आम्हाला माहीत आहे, की कोविड-19विरुद्धच्या आपत्कालीन लशींच्या यादीत कोवॅक्सिनचा समावेश करण्यासाठी बरेच जण डब्ल्यूएचओच्या शिफारशीची वाट पाहत आहेत. परंतु आम्ही घाईगडबडीने निर्णय घेऊ शकत नाही. आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यासाठीच्या उत्पादनाची ते सुरक्षित आणि प्रभावी आहे याची खात्री करण्यासाठी त्याचं पूर्णपणे मूल्यांकन केल्याशिवाय आम्ही शिफारस करू शकत नाही, असंही डब्ल्यूएचओने या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    First published:

    Tags: Corona, Corona updates, Corona vaccination, Corona vaccine, Corona vaccine cost