Home /News /coronavirus-latest-news /

भारतीय डॉक्टर कोविड-19 लसीचे बूस्टर शॉट्स का घेत आहेत

भारतीय डॉक्टर कोविड-19 लसीचे बूस्टर शॉट्स का घेत आहेत

लसीकरणाचा पहिला आदेश आल्यापासून जवळपास वर्षभराने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांमध्ये एक नवीन आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहे. लस घेतल्यानंतर काही महिन्यांनी अनेकांना त्यांच्या शरीरात अॅंटीबॉडीज अजिबातच अस्तित्वात नसल्याचे लक्षात येते आहे.

पुढे वाचा ...
    या महामारीच्या पहिल्या लाटेपासूनच, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी या संसर्गाविरुद्ध संरक्षणाची पहिली फळी म्हणून उदयास आले. त्यांच्या योगदानाची मोठ्या प्रमाणावर नोंद घेतली गेली आणि कौतुकही झाले. यातील काहींनी या धाडसी व्यावसायिकांसाठी कामकाजासाठी चांगली परिस्थिति निर्माण केली आहे, यात सुरक्षा उपकरणांच्या अधिक चांगल्या तरतुदींचाही समावेश आहे. जेव्हा भारतामध्ये पहिल्यांदाच लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे निर्धारित करण्यात आली तेव्हाच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांचे महत्त्व लक्षात आले, म्हणूनच त्यांना कोविड-19 लस घेण्यासाठी सर्वाधिक प्राधान्य असलेल्या गटात समाविष्ट करण्यात आले. परंतु, लसीकरणाचा पहिला आदेश आल्यापासून जवळपास वर्षभराने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांमध्ये एक नवीन आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहे. लस घेतल्यानंतर काही महिन्यांनी अनेकांना त्यांच्या शरीरात अॅंटीबॉडीज अजिबातच अस्तित्वात नसल्याचे लक्षात येते आहे. ऍन्टीबॉडीज चाचण्या करताना हे लक्षात आले, आणि ही एक अत्यंत चिंतेची बाब आहे. यापैकी अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय व्यावसायिक अजूनही कोविड-19 चे उपचार आणि व्यवस्थापन यांमध्ये गुंतलेले आहेत. म्हणूनच, त्यांना कोविड-19 चे बूस्टर शॉट्स देण्यात येत आहेत. यातील बहुतेक 'बूस्टर' शॉट्स लसीच्या कुपीमध्ये असलेल्या अतिरिक्त डोसमधून काढलेले असल्याने, ते कोणाच्याही लक्षात न येण्यासारखे आणि बेहिशेबी राहतात. अमेरिकेसारख्या काही देशांमध्ये, संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेल्या नागरिकांना बुस्टर शॉट्स घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. पण भारत, 3 ऑक्टोबरपर्यंत आपल्या पात्र प्रौढ लोकसंख्येच्या केवळ 26.3% लोकांचेच संपूर्ण लसीकरण झालेले असल्याने लसींचे समान वितरण आणि उपलब्धता यांविषयीच्या चिंता काहीशा दूर झाल्या आहेत. लसींच्या दुसर्या डोसनंतर झपाट्याने कमी होणार्या अॅंटीबॉडीजच्या रिपोर्ट्सवरुन हे लक्षात येते की, भारतीय लोकसंख्येपैकी निम्म्याहून अधिक लोकांचे लसीकरण पूर्ण होणे बाकी असले तरीही अनेक लोकांना बूस्टर शॉट्सची गरज पडू शकते. डॉक्टर आणि आरोग्यसेवा कर्मचारी यांनी याची कमान सांभाळली असल्याने ही एक तातडीची व चिंतेची बाब बनली आहे. डॉक्टर घेत असलेले बूस्टर शॉट्स हे नियमांचे उल्लंघन ठरू शकत असले तरीही त्यांनी आपली कर्तव्ये पार पाडताना कोणत्याही आकस्मिक धोके व नैतिक धोके पत्करण्यास मागेपुढे पाहिले नाही. याखेरीज वैयक्तिक धोका म्हणजे डॉक्टरांना विशेषकरून त्यांच्या कुटुंबाला संसर्ग होण्याची चिंता वाटत असते. ज्या घरांमध्ये दोन्ही पालक हे डॉक्टर्स असतात त्या घरातील मुले व वयस्क नातेवाईकांना संसर्गाचा अधिकाधिक धोका असतो. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांच्या दृष्टीकोनातून, उच्च धोका असलेल्या व्यक्तींसाठी लसीचा तिसरा बूस्टर शॉट देणे हा एकमेव उपाय आहे. संसाधनांना दिशा देणे आणि लसीकरणाच्या प्रयत्नांना बळ देण्याव्यतिरिक्त, बूस्टर डोस भारताच्या लोकसंख्येच्या सर्वांत असुरक्षित घटकांना मजबूत करण्यास आणि आपले सामूहिक आरोग्य आणि रोग प्रतिकारशक्ती आणखी सुरक्षित करण्यात मदत करतील. प्रत्येक भारतीयाला लस मिळण्यास मदत व्हावी यासाठीच्या Network18 Sanjeevani – A Shot Of Life( ए शॉट ऑफ लाईफ), a FederalBank Ltd. च्या प्रयत्नांमध्ये सामील व्हा. सीएसआर उपक्रम. भारताच्या आरोग्य आणि प्रतिकारशक्तीसाठी संघटित होण्याची ही वेळ आहे.
    First published:

    Tags: Corona vaccination, Sanjeevani

    पुढील बातम्या