मराठी बातम्या /बातम्या /विदेश /धक्कादायक! Sputnik V लस घेतल्यावर HIV होण्याची शक्यता? या देशाने घातली Vaccine वर बंदी

धक्कादायक! Sputnik V लस घेतल्यावर HIV होण्याची शक्यता? या देशाने घातली Vaccine वर बंदी

 रशियाची स्पुटनिक व्ही ही लस घेतल्यावर (Possibility of getting HIV positive increases in mails after getting Sputnik V vaccine claims SA) पुरुषांना एचआयव्ही होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रशियाची स्पुटनिक व्ही ही लस घेतल्यावर (Possibility of getting HIV positive increases in mails after getting Sputnik V vaccine claims SA) पुरुषांना एचआयव्ही होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

रशियाची स्पुटनिक व्ही ही लस घेतल्यावर (Possibility of getting HIV positive increases in mails after getting Sputnik V vaccine claims SA) पुरुषांना एचआयव्ही होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

विंडहोक, 24 ऑक्टोबर : रशियाची स्पुटनिक व्ही ही लस घेतल्यावर (Possibility of getting HIV positive increases in mails after getting Sputnik V vaccine claims SA) पुरुषांना एचआयव्ही होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. दक्षिण अफ्रिकेतील वैज्ञानिकांनी हा दावा केल्यानंतर त्याच्या शेजारी असणाऱ्या नामिनिबायनं (Namibia bans Sputnik V) या लसीवर बंदी घातली आहे. यापुढे या लसीच्या आयातीवर आणि वितरणावर बंदी असेल, अशी घोषणा नामिबियानं केली आहे. त्यामुळे जगभरात खळबळ उडाली आहे.

काय आहे दावा?

दक्षिण अफ्रिकेतील आरोग्य नियामक यंत्रणा असणाऱ्या SAHPRA नं स्पुटनिक व्ही लस ही पुरुषांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचं संशोधन जाहीर केलं आहे. या लसीमध्ये वापरण्यात आलेल्या एडेनोव्हायरस टाईप-5 व्हेक्टरमुळे पुरुषांना एचआयव्ही होण्याची शक्यता बळावते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे आपल्या देशात स्पुटनिक व्ही लसीच्या वितरणावर आणि आयातीवर बंदी असेल, अशी घोषणा दक्षिण अफ्रिकेनं केली होती. त्यानंतर लगेचच नामिबिया देशानं या लसीवर बंदी घातली आहे.

कंपनीकडून खेद व्यक्त

स्पुटनिक व्ही ही लस तयार करणाऱ्या जमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूटनं नामिबिया सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. कुठल्याही शास्त्रीय माहितीच्या आधारावर त्यांचा निष्कर्ष आधारित नसल्याचा दावा कंपनीनं केला आहे. या निर्णयामुळे जगभरात स्पुटनिक व्ही लसीबाबत गैरसमज पसरण्याची शक्यता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन कंपनीनं केलं आहे.

हे वाचा- Corona: सणासुदीआधी केंद्रानं राज्यांना केलं अलर्ट; जारी केली मार्गदर्शक तत्वे

जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता नाहीच

अद्याप स्पुटनिक व्ही या लसीला जागतिक आरोग्य संघनेनं मान्यता दिलेली नाही. मात्र भारतात या लसीच्या आपातकालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. भारतातून अद्याप अशा प्रकारची कुठलीही तक्रार आलेली नाही. जेव्हा जागतिक आरोग्य संघटना स्पुटनिक-व्ही लसीच्या वापराला परवानगी देईल, तेव्हाच आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करू, अशी घोषणा बंदी घालणाऱ्या नामिबियानं केली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Russia, Who