Coronavirus चा धोका : तुमच्या त्वचेवर तर अशी लक्षणं नाहीत ना? दुर्लक्ष करू नका

Coronavirus चा धोका : तुमच्या त्वचेवर तर अशी लक्षणं नाहीत ना? दुर्लक्ष करू नका

शरीराच्या कोणत्याही भागावर त्वचेमध्ये असे बदल (skin problem) दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण हे कोरोनाव्हायरसचं लक्षण (symptoms of corona) असू शकतं.

  • Share this:

मुंबई, 04 मे : सर्दी, खोकला, ताप, श्वसन समस्या ही कोरोनाव्हायरसची (Coronavirus) प्रमुख लक्षणं. मात्र आता काही कोरोना रुग्णांमध्ये ही लक्षणं न दिसता इतर लक्षणं दिसू लागलीत. कोरोना रुग्णांमध्ये त्वचेच्या समस्या (skin problem) दिसू लागल्यात. स्पॅनिश अकॅडमी ऑफ डर्मटोलॉजी (Spanish Academy of Dermatology) ने या नव्या लक्षणांचा अभ्यास केला. 375 कोरोना रुग्णांचा अभ्यास केला असता, आजाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात कोरोना रुग्णांच्या त्वचेवर परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये 5 प्रकारच्या त्वचेच्या समस्या दिसून आल्यात.

Covid toe

कोरोना रुग्णांमध्ये सर्वात पहिलं त्वचेवरील लक्षण दिसून आलं ते पायांच्या बोटांवर जखम. याला डॉक्टरांनी कोविड टो असं नाव दिलं. हे लक्षण आजाराच्या सुरुवातीच्या अवस्थेत दिसतं. मात्र त्यावेळी कोरोनाची खोकला-ताप अशी दुसरी लक्षणं दिसत नाहीत.

Chilblain-like symptoms

हात आणि पायांच्या त्वचेवर दाणेदार पुरळ येतात आणि त्यांना खाज येते. हे पुरळ लाल किंवा जांभळ्या रंगाचे असू शकता. ब्रिटिश जर्नल

ऑफ डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित करण्याक आलेल्या अभ्यासानुसार 19% कोरोना रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसून आलीत.

हे वाचा - लॉकडाऊनमुळे 'कभी खुशी कभी गम', मूड स्विंग असा करा दूर

विशेषत: कमी वयाच्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं जास्त दिसून येत आहेत. या रॅशेजना  (एक प्रकारची त्वचेची समस्या) अंतर्गत ठेवण्यात आलं आहे.

Vesicular eruptions

जवळपास 9% कोरोना रुग्णांमध्ये दिसून आलेत. यामध्ये लहान लहान आकाराचे दाण्यास्वरूप पुरळ शरीराच्या कोणत्याही भागावर असतात. विशेषत: शरीराच्या मागच्या भागावर आणि गुप्तांगावर दिसून आतात. आजार गंभीर झाल्यास यामध्ये रक्त साठू लागतं आणि पुरळ फुटतात. तसंच यांचा आकारही वाढतो आणि ते पसरू लागतात. निम्म्या रुग्णांमध्ये अशी लक्षणं दिसून येतात जवळपास 10 दिवसांत जातात.

Urticarial lesion 

कोरोना रुग्णांमध्ये दिसून येणारी आणखी एक त्वचेची समस्या Urticarial lesion  शी मिळतीजुळती आहे. यामध्ये शरीराच्या बहुतेक भागावर जखमेसारखे पुरळ दिसून येतात. त्यांचा रंग सामान्यपणे पांढरा किंवा गुलाबी असतो. बहुतेक प्रकरणांमध्ये अशी लक्षणं हातांवरही दिसतात. 19% कोरोना रुग्णांमध्ये ही लक्षणं दिसून येतात जी 6 ते 7 दिवसांत गायब होतात.

Maculopapules 

हे लक्षण सर्वाधिक म्हणजे जवळपास 47% कोरोना रुग्णांमध्ये दिसून आलं आहे. यामध्ये त्वचेवर सूजेसह लहान मात्र चपटे असे पुरळ येतात. केसांच्या आसपासही असे पुरळ येतात, त्यांना खाजही येते.

हे वाचा - Lockdown मुळे बंद असलेल्या बिल्डिंगमध्ये 'या' आजाराचं संकट

कोरोनाची इतर लक्षणं दिसू लागल्यानंतर जवळपास 8 दिवसांनंतर हे पुरळ गायब होतात.

Livedo

याला Necrosis असंही म्हणतात. जेव्हा त्वचेत रक्तवाहिन्यांमध्ये ऑक्सिजन प्रवाह कमी होतो आणि त्या नीट कार्य करत नाहीत तेव्हा असे स्किन रॅशेज दिसून येतात. ही लक्षणं कोरोनाच्या वयस्कर रुग्णांमध्ये दिसून येतात, ज्यांना आधीपासूनच हृदय किंवा फुफ्फुसांसंबंधी समस्या आहे.

त्वचेवरील अशी लक्षण इतर आजारांचं लक्षणही असू शकतं, त्यामुळे अशी लक्षणं म्हणजे आपल्याला कोरोनाव्हायरसचीच लागण झाली असावी असं मानून घाबरून जाऊ नका. मात्र त्याकडे दुर्लक्षही करू नका. डॉक्टरांकडे जा आणि तपासणी करून घ्या.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - कोरोनाने होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूमागे 'हे' कारण, भारतीय वंशाच्या डॉक्टरचा इशारा

First published: May 4, 2020, 1:03 PM IST

ताज्या बातम्या