मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

Lockdown मुळे बंद असलेल्या बिल्डिंगमध्ये 'या' आजाराचं संकट

Lockdown मुळे बंद असलेल्या बिल्डिंगमध्ये 'या' आजाराचं संकट

बंद इमारतीतील पाण्यात विशेष प्रकारच्या बॅक्टेरियांची पैदास होण्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बंद इमारतीतील पाण्यात विशेष प्रकारच्या बॅक्टेरियांची पैदास होण्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बंद इमारतीतील पाण्यात विशेष प्रकारच्या बॅक्टेरियांची पैदास होण्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

  • Published by:  Priya Lad
नवी दिल्ली, 03 मे : कोरोनाव्हायरसचा (coronavirus) प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन (lockdown) लागू करण्यात आला आहे. देशातील अनेक हॉटेल्स, शाळा, कॉलेज, मॉल, जिम अशी सार्वजनिक ठिकाणं बंद आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर जेव्हा ही ठिकाणं पुन्हा सुरू होतील तेव्हा या ठिकाणी आणखी एका आजाराचा सामना करावा लागू शकतो. बंद बिल्डिंगमधील पाण्याच्या पाइपमध्ये भरपूर दिवसांपासून असलेल्या पाण्यात परजीवी आणि बॅक्टेरियांची पैदास होऊ शकते, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. शास्त्रज्ञ लॉकडाऊनदरम्यान बंद असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा अभ्यास करत आहेत आणि त्याचा सुरक्षितपणे पुनर्वापर कसा होईल, हे समजून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हे वाचा - कोरोनाने होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूमागे 'हे' कारण, भारतीय वंशाच्या डॉक्टरचा इशारा अमेरिकेत कित्येक दिवसांपासून बंद असलेल्या परड्यु युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमधील इमारतींमधील पाण्यांचे नमुने घेण्यात आले होते. बंद असलेल्या या इमारतीतल्या पाण्यात कीटाणूनाशक नसल्याचं दिसलं. आणखी काही दिवस या इमारतीतल्या पाण्यात सूक्ष्मजीवांमध्ये पुढील काही महिन्यांत काय बदल होतात, हे पाहण्याचा प्रयत्न आता शास्त्रज्ञ करत आहेत. परड्यु युनिव्हर्सिटीतील पर्यावरण इंजीनिअर एंड्रयू वेलटन यांच्या मते, मोठ्या इमारतींबाबत लोकांमध्ये जास्त जागरूकता नाही कारण याबाबत काही मार्गदर्शन करण्यात आलेलं नाही. वेल्टीन आणि त्यांच्यासह काम करणाऱ्या इंजिनीअर कॅटलिन प्रॉक्टर यावर काम करत आहेत. हे वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यात होणार 'प्लाझ्मा थेरेपी', ICMRने घेतला मोठा निर्णय कोणतीही इमारत जितके दिवस रिकामी असते, तितकीच ती नुकसानकारक ठरण्याची शक्यता असते. वॉटर ट्रिटमेंट आणि त्यानंतर पाण्याचा वापर यामध्ये भरपूर कालावधी गेल्याने पाण्यात बॅक्टेरियांची पैदास होऊ शकते. शास्त्रज्ञांनी लीजोनेला (Legionella) या विशेष प्रकारच्या बॅक्टेरियाबाबत चिंता व्यक्त केली आहे. हे बॅक्टेरिया लीजोनायर्स (Legionnaires) आजार पसरवतात. लीजोनायरर्स हा अमेरिकेत पाण्यामार्फत पसरणारा एक आजार आहे. या आजार थेट श्वसनप्रणालीवर हल्ला करतो. प्रॉक्टर यांच्या मते, कोरोनाव्हायरसमुळे संक्रमित झालेली लोकं या बॅक्टेरियांमुळेही संक्रमित होऊ शकतात. मात्र जर बंद इमारतीतील नळांमधून थोडंथोडं पाणी जाऊ दिलं, तर या आजाराचं संकट टाळता येऊ शकतं, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. यासाठी योग्य व्यवस्थापनाची गरज असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड
First published:

Tags: Water

पुढील बातम्या