लॉकडाऊनमुळे लाइफस्टाइल बदलली आहे, त्यामुळे मानसिक ताणही वाढत आहे. बहुतेकांना मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतं आहे. त्यापैकीच एक म्हणजे मूड स्विंग. मूड सातत्याने बदलत राहतो. कधी अति आनंदी असतो तर अति निराश होतो. कॉर्टिसॉल हार्मोन्स किंवा थायरॉइडच्या असंतुलनामुळे अशी समस्या उद्भवू शकते. मूड स्विंग कसा दूर कराल, याच्यासाठी काही टीप्स
पुरेसं पाणी प्या - किमान 8 से 10 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहतंच शिवाय रक्तप्रवाहही सुरळीत राहतं. त्यामुळे मूड स्विंगवर नियंत्रण राहण्यास मदत मिळेल. मन शांत राहिल आणि पुरेशा प्रमाणात ऊर्जाही मिळेल.
व्यायाम करा - मूड स्विंग ठिक करण्यासाठी एक्सरसाइजही फायदेशीर आहे. यामुळे शरीरातील रक्तप्रवाह चांगला राहतो, शिवाय ऊर्जाही वाढते. तणाव आणि मूड स्विंगसारख्या समस्या दूर करण्यासाठी पुशअप्स, एरोबिक्स आणि जम्पिंग स्क्वॅटसारखे एक्सरसाइज करा. शिवाय वजनही नियंत्रणात राहिल.
हेल्दी डाएट - मॅग्नेशिअम आणि व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचं सेवन जास्त करा. केळं, ऑरेंज, आवळा, लिंबू यांचं सेवन करा. यामुळे शरीराला ऊर्जाही मिळेल. डार्क चॉकलेट, हर्बल टी आणि हिरव्या भाज्याही मूड स्विंग दूर करण्यास मदत करतील. साखर आणि फॅटयुक्त पदार्थ कमी प्रमाणात असावेत.
म्युझिक ऐका - म्युझिक ऐकल्यानं मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. तुमची आवडती गाणी ऐका, संगीत ऐका आणि मूड चांगला बनवा. गाणी ऐकण्यासह तुम्हाला डान्सचीही आवड असेल तर मग काय विचारच करू नका. डान्समुळेही तुम्ही टेन्शन फ्री होऊ शकता. घरातील इतर सदस्यांनाही डान्स करायला लावा आणि एन्जॉय करा.