जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / कोरोनामुळे होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूमागे आहे 'हे' कारण, भारतीय वंशाच्या डॉक्टरचा इशारा

कोरोनामुळे होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूमागे आहे 'हे' कारण, भारतीय वंशाच्या डॉक्टरचा इशारा

कोरोनामुळे होणाऱ्या सर्वाधिक मृत्यूमागे आहे 'हे' कारण, भारतीय वंशाच्या डॉक्टरचा इशारा

कोरोनाने जगात हाहाकार उडाला असून यामुळे अनेक देशांमध्ये लॉकाडऊन करण्यात आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 03 मे : कोरोना व्हायरसमुळे जगात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. एकट्या अमेरिकेत मृतांची संख्या 70 हजारापर्यंत पोहोचली आहे. दरम्यान, या मृत्यूला निकृष्ट दर्जाचं अन्न आणि कार्यशैली जबाबदार असल्याचं ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या डॉक्टरने म्हटलं आहे. डॉक्टर असीम मल्होत्रा यांनी म्हटलं की, कोरोना व्हायरसविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार करायचा असेल तर पाकिटबंद खाद्यपदार्थ खाणं कमी करा. स्थूलपणा आणि जास्त वजन ही सर्वात मोठी समस्या आहे. तसंच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यालाही हे कारणीभूत ठरत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. असीम मल्होत्रा म्हणाले की, भारतात कार्यशैलीशी संबंधित आजारांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भारत जरा संवेदनशील आहे.  टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असलेल्यांना कोरोनाचा धोका जास्त आहे. कारण या लोकांचे वजन आणि मेटॉबॉलिझमशी संबंधित आजार आहेत. अमेरिका आणि ब्रिटनमध्ये 60 टक्क्यांहून अधिक वृद्धांचे वजन जास्त आहे. लोकांनी त्यांच्या प्रकृतीनुसार खाण्यापिण्यात बदल केला तर काही आठवड्यात सुधारणा होऊ शकते. कार्यशैलीत बदल केल्यानं आरोग्यावर चांगले वाईट परिणाम होतात. त्यामुळे चुकीची कार्यशैली बदलल्यास आरोग्य चांगले होईळ आणि औषध उपचारांची गरज कमी होईल असेही असीम मल्होत्रा म्हणाले. हे वाचा : लक्षण दिसण्याआधीच Cancer चं निदान करणार फक्त एक ब्लड टेस्ट, शास्त्रज्ञांचा दावा भारतीयांबाबत सांगायचे तर इथले लोक कार्बोहायड्रेटचा समावेश असलेलं जेवण जास्त खातात. जर याचं प्रमाण अधिक असेल तर ते घातक आहे. काऱण यामुळे साखर आणि इन्सुलिन वाढतं. गव्हाचं पीठ आणि तांदूळ यांचा आहारात समावेश असेल तर त्यातूनही याचं प्रमाण वाढतं असंही ते म्हणाले. हे वाचा : शरीर हेल्दी आणि मन शांत ठेवण्यासाठी उत्तम आहे Color Therapy

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात