मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Coronavirus: चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; अनेक शहरांत Lockdown, Corona ची चौथी लाट धडकणार?

Coronavirus: चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; अनेक शहरांत Lockdown, Corona ची चौथी लाट धडकणार?

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Coronavirus news updates: भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. मात्र, त्याच दरम्यान चीनमधून धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे.

नवी दिल्ली, 15 मार्च : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा चीनमध्ये पुन्हा एकदा उद्रेक (Coronavirus outbreak in China) पहायला मिळत आहे. चीनमध्ये दररोज कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनमधील अनेक भागांत पुन्हा लॉकडाऊन (Lockdown in China) लावण्यास सुरुवात झाली आहे. कोट्यवधी नागरिक लॉकडाऊनमध्ये असून त्यांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वांचीच चिंता वाढवली आहे.

चीनमध्ये रविवारी 3400 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. यापैकी 1800 जणांना लक्षणे होती. यामुळे चीनमधील शेनझेन येथील 1.75 कोटी नागरिकांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर आता आलेल्या आकडेवारीनुसार, चीनमध्ये 5280 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. ही आकडेवारी धडकी भरवणारी आहे.

कोरोनाची चौथी लाट धडकणार?

जगभरातील अनेक देशांमध्ये जनजीवन पूर्वपदावर येत असताना आता आशिया खंडात पुन्हा कोरोनाचा उद्रेक दिसून येत आहे. खबरदारी न घेतल्यास जगभरात कोरोनाचा उद्रेक होऊन धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच कोरोनाची नवी लाट पहायला मिळू शकते असा इशाराही जागतिक आरोग्य संघटनेने तसेच इतरही शास्त्रज्ञांनी दिला आहे.

वाचा : पुन्हा कोरोना! प्रकोप वाढला; चीनमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येत दोन वर्षांतला उच्चांक

चीनमधील या भागांत सर्वाधिक रुग्ण

चीनमधील जिलिन शहरात यापूर्वी लॉकडाऊन लावण्यात आला होता. तर शेजारील राज्यांच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या. जिलिनला लागून असलेल्या यांजीची सीमा उत्तर कोरियाला लागून आहे. या ठिकाणी एकूण सात लाख नागरिक राहतात. त्यामुळे येथे अत्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रविवारी जिलिन शहरात 1412 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. हे शहर चीनच्या ईशान्येला आहे. रविवारपर्यंत जिलिन येथे एकूण 2052 बाधितांचीन नोंद झाली. त्यापैकी 1227 जणांना लक्षणे नव्हती. चीनमधील जिलिन शहर आणि चांगचुन राज्यात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पहायला मिळत आहे.

वाचा : सावधान! धोका अजूनही टळला नाही; चीनमध्ये कोरोनानं वर काढलं डोकं; Wuhan हॉटस्पॉट

हाँगकाँगमध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली

येथील नेत्या कॅरी लॅम यांनी सोमवारी सांगितले की, जर आपण नवीन आकडेवारी पाहिली तर शहराची आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडत आहे. पण महामारी सुरू झाल्यापासून आम्ही कठोर निर्बंध लागू करुन आवश्यक त्या उपाययोजना करत आहोत. येथे दोन व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, इतर संस्था आणि सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवण्यात आली आहेत. सोमवारी हाँगकाँगमध्ये एका दिवसात 249 जणांचा मृत्यू आणि 26,908 नवीन रुग्णांची नोंद झाली.

First published:
top videos

    Tags: China, Coronavirus, Lockdown