बीजिंग, 07 मार्च : गेल्या दोन वर्षांपासून जगातील अनेक देश कोरोनाचा
(Corona) सामना करत आहेत. भारतातही
(India) काही वेगळी स्थिती नाही. देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. रुग्णसंख्या कमी झाल्याने सरकार आणि प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. देशात कोरोनाची तिसरी लाट
(Third Wave) आता ओसरल्याचं चित्र आहे. दुसरीकडे लसीकरण मोहीम
(Vaccination) वेगात सुरू आहे. निर्बंध शिथिल झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु, आता पुन्हा चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. चीनमध्ये
(China) एका दिवसांत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. ही संख्या दोन वर्षातली सर्वाधिक संख्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा अन्य देश सतर्क झाले असून, नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
बोर्डाच्या परीक्षेदरम्यान संपूर्ण राज्यात Internet सेवा ठप्प; या राज्याचा निर्णय
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. चिनी प्रसार माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात महामारीच्या सुरूवातीला वुहानमध्ये
(Wuhan) कोरोनाचा प्रकोप झाला होता, त्यानंतर आता एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. चीनमध्ये एकूण 526 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं असून, ही संसर्गाची गेल्या दोन वर्षांमधली एका दिवसातली सर्वाधिक संख्या आहे. यापैकी 214 रुग्ण हे लक्षणं असलेले
(Symptomatic) तर 312 रुग्ण लक्षणं नसलेले
(Asymptomatic) होते. इतकी रुग्णसंख्या ही कोविड झीरो धोरणाला
(Covid Zero Strategy) मोठा धक्का आहे, असं चीनने म्हटलं आहे. चीनमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर अन्य देशही सतर्क झाले आहेत. नागरिकांनी नियमांचं पालन करावं, असं आवाहन केलं जात आहे.
माध्यमांच्या अहवालानुसार, चीनमधल्या किंगडाओ शहरात ओमिक्रॉनच्या (Omicron) 88 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले हे सर्व विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे. चीनमध्ये या वर्षात एका दिवसात झालेल्या संसर्गाची ही संख्या सर्वाधिक असल्याचं बोललं जात आहे.
जगभरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 44.66 कोटींच्या पुढे गेली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 60 लाखांच्या जवळपास पोहोचला आहे. गेल्या महिन्याभरात जगात कोरोनाचे 5.22 कोटीहून अधिक रुग्ण आढळले आहेत.
PM मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात 35 मिनिटं फोनवर चर्चा, या मुद्द्यांवर दिला भर
भारतातील कोरोनाची स्थिती
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सोमवारी एका दिवसात 4362 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,29,67,315 झाली आहे. एका दिवसात 66 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची एकूण संख्या 5,15,102 वर पोहोचली आहे. देशातली कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होऊन 54,118 वर आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.