Home /News /videsh /

पुन्हा कोरोना! संसर्गाचा प्रकोप वाढला; चीनमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या दोन वर्षांतल्या उच्चांकावर

पुन्हा कोरोना! संसर्गाचा प्रकोप वाढला; चीनमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या दोन वर्षांतल्या उच्चांकावर

Omicron Variant america

Omicron Variant america

चीनमध्ये (China covid-19 cases on surge) रुग्णसंख्या वाढत असल्याच्या बातमीनं सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

बीजिंग, 12 मार्च:  जगभरात कोरोना विषाणूच्या (Coronavirus increasing in China) संसर्गाला नुकतीच दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. आता बहुतांश ठिकाणी कोरोना संसर्गाचा प्रकोप ओसरत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जनजीवनही पूर्वपदावर येत आहे; मात्र त्याचवेळी चीनमध्ये (China covid-19 cases on surge) रुग्णसंख्या वाढत असल्याच्या बातमीनं सर्वत्र चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, चीनमधल्या अनेक शहरांमध्ये सध्या ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग वेगाने वाढत असून, तिथं दररोज 1500 नवीन रुग्ण आढळत आहेत. हे प्रमाण 2020च्या सुरुवातीला आढळणाऱ्या उच्चांकी रुग्णसंख्येएवढं असल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे लवकरात लवकर या विषाणूपासून मुक्ती मिळवण्याचं चीन सरकारचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य होण्याची कोणतीही चिन्हं दिसत नाहीत. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, दररोज 476 स्थानिक रुग्णांपैकी पाच रुग्ण सुरुवातीला कोणतीही लक्षणं न आढळणारे असतात. नंतर त्यांच्यात लक्षणं आढळत आहेत. 1048 लक्षणविरहित रुग्ण देशांतर्गत संक्रमणातून बाधित झाल्याचं आढळलं असून, त्यांचा चाचणी अहवाल अद्याप यायचा आहे.

पुन्हा येणार संकट? आला कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक व्हेरियंट; WHO नंही दिला दुजोरा

या पार्श्वभूमीवर चीनमधल्या अनेक शहरांमध्ये सामूहिक कार्यक्रमांना बंदी, मोठ्या प्रमाणात चाचण्या करणं आणि शाळांमध्ये विद्यार्थांच्या प्रत्यक्ष उपस्थितीवर मर्यादा असे अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. उत्तरपूर्व जीलीन प्रांतात (Jilin Provenance) सर्वाधिक संसर्ग आढळून येत असून, तिथल्या महापौरांना पदावरून हटवण्यात आलं आहे. या प्रांताची राजधानी शांगचूनच्या प्रमुखालाही पदावरून हटवण्यात आलं आहे. 90 लाख लोकसंख्या असलेल्या शांगचूनमध्ये जनतेला विनाकारण घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. जीलीनच्या शहरी भागातही असेच निर्बंध घालण्यात आले आहेत. चीनचं आर्थिक केंद्र असलेल्या शांघायमधल्या (Shanghai) डिस्नेलँडनं (Disneyland Resort) इथं भेट देणाऱ्या नागरिकांच्या संख्येवर मर्यादा घातली आहे. 13 मार्चपासून 24 तासांपूर्वीचा कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींनाच तिथे प्रवेश देण्यात येणार आहे. कॅन्टोन फेअर (Canton Fair) हे चीनमधलं महत्त्वाचं व्यापारी केंद्रही बंद ठेवण्यात आलं आहे. Internship करताना त्याच कंपनीत Job हवाय? मग 'या' टिप्स नक्की येतील कामी; वाचा चीनमधल्या सर्व स्थानिक संस्थांनी निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी करावी, हे राजकीय कर्तव्य असल्याप्रमाणे याचं पालन करावं, अशी सूचना सरकारच्या कृती दलाने केली आहे. पुन्हा हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी जराही ढिलाई होऊ देऊ नका असंही सांगण्यात आलं आहे.
First published:

Tags: China, Coronavirus, Omicron

पुढील बातम्या