मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोना नियंत्रण कसं करायचं मुंबई, पुण्याकडून शिका; मोदी सरकारने केलं कौतुक

कोरोना नियंत्रण कसं करायचं मुंबई, पुण्याकडून शिका; मोदी सरकारने केलं कौतुक

कोरोनाची पहिली लाट (First Wave of Cororna) ओसरण्या आधीच दुसरी लाट सुरु झाली. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच कोरोना बरोबर ब्लॅक फंगस (Black Fungus)चा धोकाही वाढलेला आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसच्या केस संपूर्ण भारतामध्ये दिसू लागलेल्या आहेत.

कोरोनाची पहिली लाट (First Wave of Cororna) ओसरण्या आधीच दुसरी लाट सुरु झाली. दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांची (Corona patient) संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यातच कोरोना बरोबर ब्लॅक फंगस (Black Fungus)चा धोकाही वाढलेला आहे. कोरोनानंतर आता ब्लॅक फंगसच्या केस संपूर्ण भारतामध्ये दिसू लागलेल्या आहेत.

कोरोना नियंत्रणासाठी मुंबई, पुणे मॉडेल्सची अंमलबजावणी राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे.

नवी दिल्ली, 11 मे : देशात कोरोनाची (Coronavirus in India) प्रकरणं वाढत आहेत. त्यात महाराष्ट्रात आता कोरोना नियंत्रणात असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. राज्यात मुंबई (Coronavirus in Mumbai) आणि पुण्यात (Coronavirus in Pune) कोरोनाने सर्वात जास्त थैमान घातलं होतं. पण दोन्ही शहरांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेलाही चांगलंच नियंत्रणात ठेवलं आहे. सुरुवातीला सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या मुंबई, पुण्याचं आता मोदी सरकारनेही कौतुक केलं आहे. कोरोना नियंत्रणासाठी मुंबई, पुणे मॉडेल्सची अंमलबजावणी राष्ट्रीय पातळीवर व्हायला हवी, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health ministry) म्हटलं आहे.

देशातील कोरोनाच्या सद्यपरिस्थितीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुंबई, पुण्याचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आला. हा उल्लेख इथली कोरोना प्रकरणं वाढत आहेत म्हणून नाही तर ती नियंत्रणात असल्याचा होता. या दोन्ही शहराच्या मॉडेल्सची अंमलबजावणी राष्ट्रीय पातळीवरही व्हावी, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं.

केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं, "कोविड-19 संसर्ग नियंत्रणासाठी मुंबईने अमलात आणलेले विकेंद्रीकरणाचे मॉडेल देशपातळीवर राबवण्याची गरज आहे. नागरिकांना संपर्क साधता यावा, त्यांच्या अडचणी सांगता याव्यात, यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले होते, मात्र ते महापालिका पातळीवर नाही तर वॉर्ड पातळीवर तयार करण्यात आले होते. 24 वॉर्डासाठी प्रत्येकी एक असे 24 नियंत्रण कक्ष स्थापण्यात आले होते. मुंबई महापालिकेकडे जे रुग्णचाचणीचे रिझल्ट येत, ते संबंधित वॉर्डातल्या नियंत्रण कक्षात पाठवले जात. हे कक्ष केंद्र म्हणून काम करत आणि त्यानुसार प्रत्येक वॉर्डात रुग्णसंख्या कमी करण्यावर भर देण्यात आला"

हे वाचा - Virafin : कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणार औषध; Zydus cadila ने जारी केली किंमत

लव अग्रवाल पुढे म्हणाले, "प्रत्येक वॉर्डरूम मध्ये 30 दूरध्वनी लाईन्स होत्या, त्या सांभाळण्यासाठी 10 फोन ऑपरेटर्स, 10 डॉक्टर्स आणि 10 रुग्णवाहिका होत्या. तसंच, खाटांची उपलब्धता सांगणारे 10 डॅशबोर्डदेखील या कक्षांमध्ये लावण्यात आले. या सर्व प्रयत्नांमुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी लोकांना काहीही त्रास झाला नाही"

"याशिवाय, 800 SUV गाड्या तात्पुरत्या रुग्णवाहिका म्हणून रुपांतरीत करण्यात आल्या होता. या सर्व रुग्णवाहिकांचा माग काढत त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी एक  सॉफ्टवेअर प्रोग्राम तयार करण्यात आला.  या सर्व व्यवस्था समन्वय राखून योग्यप्रकारे काम करत होत्या, जेणेकरुन रुग्णांना बेड मिळण्यात काहीही अडचण येऊ नये.", असं सांगत अग्रवाल यांनी मुंबई महानगरपालिकेच्या या योजनाबद्ध प्रयत्नांचं कौतुक केलं.

हे वाचा - कोरोनातून बचावल्यानंतर हा आजार घेतोय जीव; राज्य सरकारने पहिल्यांदाच दिली कबुली

पुण्यानेही कोविड-19 च्या रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी मिळवलेल्या यशाबद्दल आरोग्य मंत्रालयाने पुण्यातील यंत्रणांचंही कौतुक केलं. संसर्गाचे प्रमाण कसं नियंत्रणात आणता येईल, यासाठी या उपाययोजना आदर्श उदाहरण ठरल्या आहेत.

जेव्हा पुण्यात, रुग्ण पॉझिटिव्ह असण्याचे प्रमाण 69.7% होते, त्यावेळी पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत या काळासाठी कठोर संचारबंदी सारख्या उपाययोजना करण्यात आल्या, याचे दोन परिणाम दिसले, एक म्हणजे कोविड रुग्णांच्या वाढीचं प्रमाण कमी झालं आणि दुसरं म्हणजे कोविड रुग्ण पॉझिटिव्ह होण्याचा दर कमी झाला. आधी 41.8%  असलेला हा दर 23.4 %. पर्यंत कमी झाला.

"मोठे समारंभ, लोकांची गर्दी यावर निर्बंध, अत्यावश्यक नसलेल्या कामांवर प्रतिबंध घालण्यासारखे कठोर उपाय साधारण 15 दिवसांसाठी केल्यावर, रुग्णवाढीचा दर कमी होतो आणि रुग्णवाढीचा चढता आलेख सपाट व्हायला सुरुवात होते, असे आमचे निरीक्षण आहे", असं लव अग्रवाल यांनी सांगितलं.

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus cases, Mumbai, Pune