मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Virafin : कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणार नवं औषध; Zydus cadila ने जारी केली किंमत

Virafin : कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरणार नवं औषध; Zydus cadila ने जारी केली किंमत

कोरोना रुग्णांवर आपात्कालीन वापरासाठी झायडस कॅडिलाच्या (Zydus cadila) विराफिन (Virafin) औषधाला मंजुरी दिलेली आहे.

कोरोना रुग्णांवर आपात्कालीन वापरासाठी झायडस कॅडिलाच्या (Zydus cadila) विराफिन (Virafin) औषधाला मंजुरी दिलेली आहे.

कोरोना रुग्णांवर आपात्कालीन वापरासाठी झायडस कॅडिलाच्या (Zydus cadila) विराफिन (Virafin) औषधाला मंजुरी दिलेली आहे.

अहमदाबाद, 11 मे : एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. अशात आता केंद्र सरकारने ऑक्सिजनची गरज कमी भासेल अशा औषधांवर भर दिलेला आहे. त्यापैकीच एक औषध म्हणजे झायडस कॅडिलाचं (Zydus cadila) विराफिन (Virafin) हे अँटिव्हायरल औषध. कोरोना रुग्णांवर आपात्कालीन वापरासाठी या औषधाला मंजुरी दिल्यानंतर आता कंपनीने या औषधाची किंमत जारी (Virafin Price) केली आहे.

विराफिनच्या एका डोसची किंमत 11,995  रुपये आहे, असं कंपनीने सांगितलं आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार कंपनीने हे औषध पाठवण्यास सुरुवात केली आहे. या औषधामुळे रुग्णांना ऑक्सिजनची गरज कमी भासेल असा दावा कंपनीने केला आहे.

झायडस कॅडिला ही अहमदाबादमधील औषध कंपनी. झायडस कॅडिलाचं  इंटरफेरॉन अल्फा - 2 बी Interferon alpha-2b म्हणजे Virafin हे अँटिव्हायरल औषध. PegIFN म्हणूनही हे औषध ओळखलं जातं. हिपेटायटिस सी साठी Virafin हे औषध तयार करण्यात आलं होतं. 10 वर्षांपूर्वी या यकृतासंबंधी आजारावर उपचारासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली होती.

हे वाचा - कोरोनातून बचावल्यानंतर हा आजार घेतोय जीव; राज्य सरकारने पहिल्यांदाच दिली कबुली

या औषधामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होतो, असा दावा कंपनीने केला आहे. या औषधाची कोरोना रुग्णांवर चाचणी घेण्यात आली. या चाचणीत ज्या रुग्णांना औषध देण्यात आलं, त्यापैकी  91.15% रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी 7 दिवसांतच निगेटिव्ह आली, असं कंपनीने सांगतिलं आहे. औषधामुळे आजारामुळे निर्माण होणारी गुंतागुंतही कमी होते. शिवाय रुग्णाला ऑक्सिजनवर ठेवण्याचा कालावधीही कमी होतो, असं कंपनीनं सांगितलं.

हे वाचा - येथे 1 रुपयांत गरजूंना मिळेल Oxygen Concentrator, केवळ करावा लागेल एक ई-मेल

त्यामुळे हे औषध कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापरण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कंपनीने केली होती.  कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपात्कालीन मंजुरी द्यावी अशी मागणी कंपनीने ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाकडे (DCGI) केली होती. 23 एप्रिलला डीसीजीआयने या औषधाला मंजुरी दिली आहे. आता या औषधाचा कोरोना रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जाणार आहे. मध्यम स्वरूपाची लक्षणं असलेल्या रुग्णांना हे औषध दिलं जाणार आहे.

First published:

Tags: Corona, Corona patient, Coronavirus