मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Fish Biscuits: बिस्किट खाऊन करा कोरोनापासून बचाव, माशांपासून बनलेलं खास प्रोडक्ट

Fish Biscuits: बिस्किट खाऊन करा कोरोनापासून बचाव, माशांपासून बनलेलं खास प्रोडक्ट

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढे, पौष्टिक पदार्थ असे विविध पर्याय सुचवण्यात येत आहेत. एका संशोधनातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी माशांपासून बिस्कीटं (Fish Biscuits) तयार करण्यात आली आहेत. (फोटो-सांकेतिक)

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढे, पौष्टिक पदार्थ असे विविध पर्याय सुचवण्यात येत आहेत. एका संशोधनातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी माशांपासून बिस्कीटं (Fish Biscuits) तयार करण्यात आली आहेत. (फोटो-सांकेतिक)

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढे, पौष्टिक पदार्थ असे विविध पर्याय सुचवण्यात येत आहेत. एका संशोधनातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी माशांपासून बिस्कीटं (Fish Biscuits) तयार करण्यात आली आहेत. (फोटो-सांकेतिक)

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 07 जुलै: कोरोना विषाणूचा (Coronavirus) सामना करण्यासाठी महत्त्वाची ठरते ती आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity). रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर या विषाणूवर मात करणं सहज शक्य आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढे, पौष्टिक पदार्थ असे विविध पर्याय सुचवण्यात येत आहेत. याबाबत संशोधन करून नवीन पर्यायही आणले जात आहेत. अशाच एका संशोधनातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी माशांपासून बिस्कीटं (Fish Biscuits) तयार करण्यात आली आहेत.

लुधियानातील गुरु अंगद देव व्हेटर्नरी अँड अॅनिमल सायन्सेस युनिव्हर्सिटी (Guru Angad Dev Veterinary and Animal Sciences) अर्थात गडवासूच्या कॉलेज ऑफ फिशरिजमधील संशोधक डॉ. अजित सिंग (Dr. Ajit Singh) यांनी ही बिस्किटं बनवली आहेत. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रथिनं (Proteins), फायबर (Fiber) आदी आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध अशी ही बिस्किटं कोरोनावर एखाद्या औषधासारखी लागू पडू शकतात असा दावा त्यांनी केला आहे. आजतकने याबाबत वृत्त दिलं आहे.

हे वाचा-आईच्या पोटात असल्यापासून ते जन्मानंतर; बाळांवर कसा परिणाम करतो कोरोनाव्हायरस?

या बिस्किटांमध्ये कार्प माशांच्या मांसासह नाचणी (Ragi) आणि ओटसचा (Oats) वापर करण्यात आला आहे. माशांवर प्रक्रिया करून प्रोटीन आयसोलेट पावडर स्वरुपात त्याचा वापर करण्यात आला आहे. यात माशाचा 50 टक्के भाग वाया जात असल्यानं या बिस्किटांची किंमत इतर बिस्किटांपेक्षा अधिक असल्याचं डॉ. अजित सिंग यांनी म्हटलं आहे.  त्यामुळे इतर बिस्किटांच्या मानाने ही बिस्किटं काहीशी महाग असली तरी ती औषधासारखं काम करतील असा दावा केला जात आहे.

या बिस्किटांमध्ये कार्बोहायड्रेडस (Carbohydrates) सामान्य बिस्किटांच्या तुलनेत 75 टक्के अधिक आहे. तसंच सामान्य बिस्किटांमध्ये प्रथिनं फक्त 5 टक्के तर फायबर केवळ एक टक्का असतात. त्यामुळं त्यांचे पोषणमूल्य कमी असते. मात्र या बिस्किटांमध्ये कार्बोहायड्रेडस 50 टक्के आहेत तर प्रथिनं 17 टक्के आहेत. नाचणीत फायबरचं प्रमाण 5 टक्क्यांहून अधिक असतं तर ओट्समध्ये 2 ते 3 टक्के असतं. त्यामुळं ही बिस्कीट पोषण मूल्यांनी समृद्ध आहेत.

हे वाचा-कोणती Corona Vaccine सर्वात प्रभावी? पाहा प्रत्येक कोरोना लशीचा Efficacy Rate

प्रथिनांचा उत्तम स्रोत असल्यानं ही बिस्किटं कोविड-19 शी लढण्यासाठी उपयुक्त आहेत. यात व्हॅनिला इसेन्स वापरल्यानं या बिस्किटांना माशांसारखा वास येत नाही. तसंच ही बिस्किटं सर्वसाधारण तापमानात दोन महिने उत्तम राहतात. सहजपणे ती कुठेही पाठवता येतात, अशी माहिती डॉ. अजित सिंग यांनी दिली आहे. कॉलेज ऑफ फिशरिजमधील फिश प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटनं या आधीही फिश फिंगर्स, फिश नगेट्स, फिश कटलेट, फिश पापड, फिश वेफर्स अशी अनेक उत्पादनं बनवली आहेत.

First published:
top videos

    Tags: Corona updates, Coronavirus