देशात कोरोनानं वाढवली चिंता! वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा होणार लॉकडाऊन?

देशात कोरोनानं वाढवली चिंता! वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा होणार लॉकडाऊन?

एका आठवड्यात जवळपास 61 हजार नवीन कोरोना पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जून : देशभरात कोरोना व्हायरसशी लढा देऊन रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं असल्याचं सांगितलं जात असलं तरीही आठवड्याभरात पुन्हा कोरोनानं चिंता वाढवली आहे. एका आठवड्यात जवळपास 61 हजार नवीन पॉझिटिव्ह केसेस समोर आल्या आहेत. आठवड्याभरात वाढलेला आकडा लक्षात घेता पुन्हा एकदा लॉकडाऊन करावं लागू शकतं असं काही वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, शुक्रवारी 9,851 नवीन लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळाली तर 273 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. देशभरात कोरोनाग्रस्तांची आतापर्यंत संख्या संख्या 2,26,770 वर पोहोचली आहे. सलग तीन दिवस प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ नोंदविण्यात आली आहे.

31 मे पर्यंत कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी 4 टप्प्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आला होता. 72 दिवसांच्या लॉकडाऊनंतर आता टप्प्या टप्प्यानं अर्थव्यवस्थेचा काही भाग खुला कऱण्यात आला आहे. unlock 1 च्या पहिल्याच टप्प्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हे वाचा-नोटांमुळे कोरोना पसरतो? धास्तावलेल्या दुकानदारांनी मोदी सरकारकडे केली ही मागणी

जगभरात सातव्या क्रमांकावर आहे भारत

जगभरात कोरोनाच्या संसर्गात भारत सातव्या क्रमांकावर आहे. अमेरिका, ब्राझील, रशिया, ब्रिटन, स्पेन आणि इटली या देशांमध्ये कोरोनाचा धोका अधिक आहे. शालीमार बाग येथील फोर्टिस हॉस्पिटलच्या फुफ्फुसाच्या रोग विभागाचे संचालक डॉ. विकास मौर्य म्हणाले, "जेव्हा लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडले जाईल, तेव्हा कोरोनाची प्रकरणे वाढतील. लॉकडाऊनमुळे संसर्ग होण्याचा धोका कमी होता. आता टप्प्या टप्प्यानं उघडल्यानंतर नियंत्रण ठेवणं कठीण होईल त्यामुळे पुन्हा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं झालं तर पुन्हा एकदा लॉकडाऊनची स्थिती निर्माण होऊ शकते असंही मौर्य यांनी सांगितलं आहे.

सोशल डिस्टन्सचं पालन, नियम पाळणं आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. सध्या पुन्हा लॉकडाऊन करावं अशी स्थिती नसली तरीही कोरोनाचा संसर्ग वाढण्याची स्थिती हाताबाहेर गेल्यास पुन्हा लॉकडाऊन करावा लागू शकतो असं फुफ्फुसांचे डॉक्टर अरविंद कुमार यांचं म्हणणं आहे.

हे वाचा-दिल्लीत चाचणी करण्यात येणाऱ्या प्रत्येक चारपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

हे वाचा-कोरोना हा व्हायरस नाही तर बॅक्टेरिया? 'त्या' व्हायरल व्हिडिओचं FACT CHECK

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 6, 2020, 9:09 AM IST

ताज्या बातम्या