कोरोनाने पुन्हा एकदा देशात विक्रम मोडला, 24 तासांतली ही आकडेवारी धक्कादायक

कोरोनाने पुन्हा एकदा देशात विक्रम मोडला, 24 तासांतली ही आकडेवारी धक्कादायक

देशात आतापर्यंत कोरोनाची 115942 अॅक्टिव्ह प्रकरणं असून 114072 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंतचा मृतांचा आकडा 6642 च्या घरात गेला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जून : देशात कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यांनी आज सगळे रेकॉर्ड मोडले आहेत. सर्व उपाययोजना आखल्या आणि कठोर लॉकडाऊन पाळला गेला असला तरी देशात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात जास्तीत जास्त नवीन प्रकरणं आणि सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 9887 नवीन प्रकरणे समोर आली असून एकूण 294 मृत्यू झाले आहेत.

देशात आतापर्यंत कोरोनाची 115942 अॅक्टिव्ह प्रकरणं असून 114072 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंतचा मृतांचा आकडा 6642 च्या घरात गेला आहे. शनिवारी आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोनाव्हायरस (Coronavirus Maharashtra) संक्रमणाची 2,436 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. तर आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 80,229 वर पोहोचला आहे. याव्यतिरिक्त राज्यात 139 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंतचा मृतांचा आकडा 2,849 वर पोहोचली आहे.

गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूमागे धक्कादायक खुलासा, अननसात नव्हते भरले फटाके तर...

तिकडे, उत्तर प्रदेशात कोव्हिड-19ची सुमारे 500 नवीन प्रकरण समोर आली आहेत. त्यामुळे राज्यात संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 9,733 वर पोहोचली आहे. इथे 12 संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे. या संक्रमित लोकांपैकी 8,8२28 लोकांवर उपचार सुरू असून तर 5,648 कोव्हिड-19 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत आणि घरी गेले आहेत, असं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

अॅक्टिव प्रकरणांमध्ये महाराष्ट्र नंबर 1आणि दिल्ली नंबर 2 वर

कोरोनाच्या महामारीमध्ये देशाचा विचार केला असता एकूण कोरोना रुग्ण, अॅक्टिव्ह संक्रमित, मृतांची संख्या आणि बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येचा अभ्यास केला तर या यादीत महाराष्ट्र नंबर 1 आणि दिल्लीचा दुसरा नंबर येतो. यानंतर तामिळनाडू तिसऱ्या क्रमांकावर आहे. मृतांच्या संख्येचा विचार केला असता गुजरात दुसऱ्या तर दिल्ली तिसऱ्या नंबरवर आहे. बरे झालेल्या रुग्णांच्या आधारे ठरवायचं झालं तर महाराष्ट्र पहिल्या आणि त्यानंतर तमिळनाडू, गुजरात, दिल्ली आणि राजस्थानचा नंबर येतो.

मुंबईत टँकर आणि पल्सरचा भीषण अपघात, आगीत होरपळल्याने तरुणाने जागीच सोडला जीव

संपादन - रेणुका धायबर

First published: June 6, 2020, 10:02 AM IST

ताज्या बातम्या