मुंबई, 12 ऑक्टोबर : विखारी प्रचार करणाऱ्या, आक्रमकपणे खोटी माहिती देणाऱ्या, समाजात तेढ निर्माण होईल असा कंटेट देणाऱ्या चॅनेल्सवर जाहिरात देणार नाही, असा मोठा निर्णय मुंबईची प्रसिद्ध बिस्किट कंपनी पारले जी ने घेतला आहे. यामुळे आता सोशल मीडियावर Parle G ची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. Twitter करांनी तर पारले जी ला Genious किताब देऊन टाकला आहे. मुंबई पोलिसांनी काही दिवसांपूर्वी TRP स्कॅम उघडकीस आणणारी पत्रकार परिषद घेतली. काही चॅनल्सनी पैसे देऊन TRP विकत घेतल्याचं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. त्या चॅनेल्सविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीआरपीचा घोटाळा समोर आल्यानंतर आता त्याच पार्श्वभूमीवर मुंबईच्या पारले-जी कंपनीने या संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. प्रक्षोभक आणि चिथावणीखोर कंटेंट दाखवणाऱ्या वृत्तवाहिन्यांवरून भविष्यात पारले जी बिस्किटांची जाहिरात केली जाणार नसल्याचं कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी घोषित केलं आहे. काही दिवसांपूर्वी तीन चॅनेल्सचं नाव TRP स्कॅममध्ये आलं होतं. त्यानंतर अनेकांनी या वृत्त वाहिन्यांना जाहिराती न देण्याचा निर्णय घेतला होता. मिंट (Hyeperlink - https://www.livemint.com/news/india/fake-trp-case-spooks-brands-11602293648000.html)ने दिलेल्या वृत्तानुसार, या निर्णयाविषयी माहिती देताना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णराव बुद्ध यांनी सांगितलं की, सामाजिक स्वास्थ बिघडवणाऱ्या आणि समाजात तेढ निर्माण करणारा कंटेंट प्रसारित करणाऱ्या टीव्ही न्यूज चॅनेल्सवरून कंपनीकडून जाहिरात करण्यात येणार नाही. त्यामुळे वृत्त वाहिन्यांना आणि इतर मनोरंजनपर वाहिन्यांना आपला कंटेंट बदलण्याची गरज असल्याचा संदेश देखील जाईल. सामाजिक स्वास्थ आणि सलोखा बिघडवणाऱ्या या वाहिन्यांवर पैसा खर्च करण्याची कंपनीची थोडीही इच्छा नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. पारलेच्या या निर्णयावर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Welcome Steps #ParleG joins the move initiated by #Bajaj #NoHateNoFear https://t.co/RLx8JoK4un
— Shrimant Mane (@ShrimantManey) October 11, 2020
पारले कंपनीने हा निर्णय घेण्याअगोदर बजाज कंपनीनेदेखील या तीन वाहिन्यांना जाहिरात न देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पारले व बजाजप्रमाणेच देशातील इतरही कंपन्यानी असा निर्णय घ्यायला पाहिजे, असेही सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.
त्याचबरोबर सामाजिक भान जपणारी कंपनी अशा शब्दांत पारलेचं कौतुकही ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
That’s the way!
— Sayema (@_sayema) October 11, 2020
You have a permanent customer in me and my family! #ParleG #Bajaj https://t.co/8dCWw0GaCw
दरम्यान, मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेचं Broadcast Audience Research Council म्हणजेच बार्कनेदेखील (BARC)कौतुक केलं आहे. पोलिसांना यासंदर्भात कोणतीही मदत करण्यास देखील तयार असल्याचं बार्कने म्हटलं आहे. त्याचबरोबर आमचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत राहणार असल्याचं देखील बार्कने या वेळी सांगितलं.

)







