Home /News /videsh /

धक्कादायक! अमेरिकेत माणसांकडून प्राण्यांमध्ये कोरोनाचा फैलाव? 10,000 मृत्यू, लक्षणंदेखील सारखीच

धक्कादायक! अमेरिकेत माणसांकडून प्राण्यांमध्ये कोरोनाचा फैलाव? 10,000 मृत्यू, लक्षणंदेखील सारखीच

माणसांकडून प्राण्यांमध्ये कोरोनाचा फैलाव होत असल्याचा दावा येथील तज्ज्ञांनी केला आहे

    वॉशिंग्टन, 12 ऑक्टोबर : कोविड-19 (Covid-19) महासाथीमुळे सुरू असलेल्या त्रासादरम्यान अमेरिकाच्या फर फार्म्समध्ये तब्बल 10,000  मिंक प्राण्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर विशेषतज्ज्ञांनी कोरोना वायरसची लागण (Corona virus) माणसांकडून प्राण्यांमध्ये(Human to animal transmission) परसत असल्याचा दावा केला आहे. हे प्राणी उटाह आणि विसकॉन्सिन स्थित फर फार्म्समध्ये मृत आढळून आले. सीएनएनच्या एका रिपोर्टनुसार केवळ उटाह भागात तब्बल 8,000 मिंक याचा मृत्यू झाला आहे. मिंक प्राणी त्यांच्या अंगावरील मऊसूत केसांसाठी ओळखले जातात. उटाहमधील एका पशूचिकित्सक डॉ. डीन टेल यांनी सांगितले की, मिंक प्राण्यात हा व्हायरस सर्वात आधी ऑगस्ट महिन्यात दिसला. यापूर्वी जुलै महिन्यात येथील काही फार्म वर्कर्सदेखील आजारी पडले होते. हे ही वाचा-किम कोरोनालाही घाबरेना, सैन्यदलाच्या भव्य कार्यक्रमात मास्कशिवाय शक्तीप्रदर्शन रुवाती रिसर्चनुसार कोरोना व्हायरस माणसांपेक्षा जास्त प्राण्यांमध्ये पसरतो. रिपोर्टमध्ये दिल्यानुसार तज्ज्ञांनी अशा प्रकाराची पुष्टी केलेली नाही. ज्यामध्ये व्हायरस प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतो. डॉ. डीन टेलर यांनी सांगितले की, उटाहमध्ये आम्ही जे काही पाहिलं , त्यानुसार व्हायरस माणसांकडून प्राण्यांमध्ये पसरला आहे. हे एक यूनिडायरेक्शनल मार्गाप्रमाणे आहे. त्यांनी पुढे सांगितले की सध्या यावर टेस्टिंग केली जात आहे. ही समस्या केवळ उटाहपर्यंत सीमित नाही. विस्कॉन्सिकमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितले की, येथे साधारण 2000 मिंक प्राण्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य पाहता स्थानिक प्रशासनाने जेथे मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे फर फार्म अनिश्चित काळासाठी क्वारंटाइन केलं आहे. यापूर्वी नेदरलँड, स्पेन आणि डेन्मार्कमध्येही असा प्रकार समोर आला आहे. यूएस डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चरच्या 'नॅशनल वेटरनरी सर्विस लैबोरेटरीज' नेदेखील अनेक प्राण्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी केली आहे. सीएनएनच्या रिपोर्टनुसार यामध्ये कुत्रा, मांजर, वाघ आणि अन्य प्राण्यांमध्ये कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जात आहे. जगभरात कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात पसरलं आहे. जगभरात लाखो रुग्णांचा यामुळे जीव दगावला आहे. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाचे बळी गेले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाख 16 हजार नागरिकांचा मृत्यू झाला आहे
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या