नवी दिल्ली 12 जानेवारी : चीन, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या साथीच्या नव्या लाटेमुळे जगाची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत कोविड-19 विषाणूबाबत भारतात दक्षता वाढवण्यात आली असून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या या ताज्या लाटेबाबत लोकांना सावध केलं आहे.
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले, की 'जगात कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी लोकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. आम्ही प्रत्येक विमानतळावर चाचणी घेत आहोत. आतापर्यंत 8700 फ्लाइट्स ट्रेस करण्यात आल्या आहेत. यामध्ये 15 लाख प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून 200 हून अधिक प्रवासी पॉझिटिव्ह आढळले आहेत.
कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये 'या' गंभीर आजाराची लक्षणं; काय आहे हा प्रकार?
जे प्रवासी कोविड पॉझिटिव्ह आढळले, त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आलं असून त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहेत, असंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. यातील अनेक प्रवाशांमध्ये BF7 प्रकार आढळून आला आहे. यासोबत ते म्हणाले, 'आपली लस BF7 प्रकारावर प्रभावी आहे. प्रत्येक पॉझिटिव्ह केसचं जीनोम सिक्वेन्सिंग केलं जात आहे, कारण भविष्यात कोणताही व्हेरिएंट नवीन रूप घेऊ शकतो'.
बुधवारी 11 जानेवारी रोजी आलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाची 171 नवीन प्रकरणं समोर आली आहेत, ज्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढून 2,342 झाली आहे.
कोरोनानंतर आता सुपरबगचा धोका; दरवर्षी होऊ शकतो एक कोटी लोकांचा मृत्यू
बुधवारी सकाळी आठ वाजता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील संक्रमित लोकांची संख्या 4,46,80,386 झाली आहे, तर मृतांची संख्या 5,30,722 वर आहे. आकडेवारीनुसार, देशातील दैनिक संसर्ग दर 0.09 टक्के आणि साप्ताहिक संसर्ग दर 0.11 टक्के नोंदवला गेला आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण संक्रमित रुग्णांपैकी 0.01 टक्के आहे, तर कोरोनामधून बरं होणाऱ्यांचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के झाला आहे. गेल्या 24 तासांत उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 23 ने वाढ झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.