जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हेल्थ / कोरोनानंतर आता सुपरबगचा धोका; दरवर्षी होऊ शकतो एक कोटी लोकांचा मृत्यू

कोरोनानंतर आता सुपरबगचा धोका; दरवर्षी होऊ शकतो एक कोटी लोकांचा मृत्यू

कोरोनानंतर सुपरबगचा धोका

कोरोनानंतर सुपरबगचा धोका

अमेरिकेत वेगानं पसरणाऱ्या एका सुपरबगनं संपूर्ण जगाला पुन्हा चिंतेत टाकलं आहे. सध्या या सुपरबगमुळे जगभरात दरवर्षी 1.3 दशलक्ष लोकांचा मृत्यू होत आहे.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 03 जानेवारी : गेल्या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात (डिसेंबर 2022) कोरोना महामारीच्या संकटानं पुन्हा जोर धरला आहे. चीनमध्ये सध्या या विषाणूने सर्वात जास्त धुमाकूळ घातला आहे. याशिवाय, जगभरातील इतर अनेक देशांनीदेखील पुन्हा कोरोना प्रतिबंधित नियम पाळण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी नवीन व्हेरियंटसह कोरोना महामारी नागरिकांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत करत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेत वेगानं पसरणाऱ्या एका सुपरबगनं संपूर्ण जगाला पुन्हा चिंतेत टाकलं आहे. सध्या या सुपरबगमुळे जगभरात दरवर्षी 1.3 दशलक्ष लोकांचा मृत्यू होत आहे. लॅन्सेट या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असं निदर्शनास आलं आहे की, अँटिबायोटिक्स आणि अँटि-फंगल औषधे देखील या सुपरबगसमोर निष्प्रभ ठरत आहेत. त्यामुळे हा सुपरबग जगासाठी नवीन प्रकारचा धोका ठरणार असल्याची चर्चा शास्त्रज्ञांमध्ये सुरू झाली आहे. ‘ एबीपी न्यूज ’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कसा आहे हा ‘सुपरबग’? हा सुपरबग गेल्या काही वर्षांत वैद्यकीय शास्त्रासमोर एक मोठं आव्हान म्हणून उभा राहिला आहे. त्याच्यामुळे कोविड-19 चा संसर्ग अधिक धोकादायक बनत आहे. लॅन्सेटमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, जर हा सुपरबग सध्याच्या वेगाने पसरत राहिला तर दरवर्षी जगभरात एक कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. काही बॅक्टेरिया मानवासाठी अनुकूल असतात तर काही मानवासाठी अत्यंत धोकादायक असतात. सुपरबग हा बॅक्टेरिया मानवासाठी घातक आहे. तो बॅक्टेरिया, व्हायरस आणि पॅरासाईट यांचा एक स्ट्रेन आहे. जेव्हा बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस किंवा पॅरासाईट्स वेळेनुसार बदलतात, तेव्हा त्यांच्यावर औषधांचादेखील परिणाम होत नाही. यामुळे त्यांच्यामध्ये अँटिमायक्रोबॉयल रेझिस्टन्स (एएमआर) क्षमता निर्माण होतो. अँटिमायक्रोबॉयल रेझिस्टन्स निर्माण झाल्यानंतर, त्या संसर्गावर उपचार करणं खूप कठीण होतं. सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास, रुग्णाच्या शरीरातील सुपरबग संसर्गासमोर औषधं कुचकामी ठरतात. कोणत्याही अँटिबायोटिक औषधाच्या अतिवापरामुळे किंवा त्याचा विनाकारण वापर केल्यामुळे सुपरबग्ज तयार होतात. डॉक्टरांच्या मते, फ्लूसारख्या विषाणूजन्य संसर्गाच्या बाबतीत अँटिबायोटिक्स घेतल्यास, सुपरबग होण्याची शक्यता जास्त असते. एका व्यक्तीला सुपरबगची लागण झाल्यास तो हळूहळू इतरांनादेखील होतो. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, आपल्या देशात न्यूमोनिया आणि सेप्टिसिमियाच्या उपचारांसाठी वापरण्यात येणारी कार्बापेनेम ही औषधं आता बॅक्टेरियांसमोर कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे या औषधांच्या निर्मितीवर बंदी घालण्यात आला आहे. अँटिबायोटिकच्या वापरात सातत्यानं वाढ लॅन्सेटमधील अभ्यासानुसार, कोरोना महामारीमुळे रुग्णालयांमध्ये एएमआरवरील भार वाढला आहे. कोरोनाच्या उपचारांदरम्यान बहुतांश रुग्णांना अँटिबायोटिक्स देण्यात आली होती. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. स्कॉलर अॅकॅडमिक जर्नल ऑफ फार्मसीच्या अहवालानुसार, गेल्या 15 वर्षांत जगभरात अँटिबायोटिक्स वापर 65 टक्क्यांनी वाढला आहे. कोरोना महामारीमुळे घाबरलेले लोक आणि प्रतिकारशक्ती कमकुवत झालेले लोक आता सर्दी-खोकल्यासाठीही अँटिबायोटिक्सचा वापर करत आहेत. या सुपरबगमुळे अमेरिकेचं पाच अब्ज डॉलर्सचं नुकसान होत आहे.

News18लोकमत
News18लोकमत

कोरोना आणि सुपरबगची जुगलबंदी लॅन्सेटनं काही दिवसांपूर्वी कोरोना महामारीच्या काळात सुपरबगमुळे झालेल्या मृत्यूंचा अभ्यास केला आहे. या अहवालानुसार, 2021 मध्ये, आयसीएमआरनं 10 रुग्णालयांमध्ये एक अभ्यास केला. त्यामध्ये असं आढळलं की, कोरोनानंतर लोकांनी जास्त अँटिबायोटिक्स वापरण्यास सुरुवात केली आहे. अँटिबायोटिक्सच्या अतिवापरामुळे सुपरबग्सशी संबंधित परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी 50 टक्क्यांहून अधिक रुग्णांना उपचारादरम्यान किंवा नंतर बॅक्टेरिया किंवा फंगसमुळे संसर्ग होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. जगभरात अँटिबायोटिक्सचा वापर वाढत राहिला तर वैद्यकीय शास्त्राला पुन्हा शुन्यापासून प्रगती सुरू करावी लागेल. हे वाचा -  जानेवारीत जन्मलेल्या मुलांमध्ये असतात हे खास गुण! जीवनात असे होतात यशस्वी हा धोकादायक बग कसा पसरतो? लागण झालेल्या व्यक्तीच्या त्वचेशी, जखमेशी, लाळेशी संपर्क झाल्यास आणि लैंगिक संबंधांद्वारे सुपरबग्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरतात. सुपरबग मानवी शरीरात गेल्यावर औषधांचा रुग्णावर होणारा परिणाम पूर्णपणे थांबतो. सुपरबग्सवर सध्या कोणतंही औषध उपलब्ध नाही. पण, योग्य पद्धतींचा अवलंब करून तो टाळता येऊ शकतो. सुपरबगमुळे कोणते आजार होतात? 2021 मध्ये, अमेरिकेतील 10 हून अधिक संशोधनांमध्ये असं निदर्शनास आलं की, सुपरबग्समुळे अकाली जन्माचा धोका वाढतो. पुरुषांना लघवीशी संबंधित समस्या सुरू होतात. मानवांमध्ये सुपबगच्या दीर्घकालीन दुष्परिणामांबाबत अजून संशोधन केलं जात आहे. हे वाचा -  पुण्यातलं कोयता प्रकरण ताजं असतानाचं आता लोणावण्यात कोयत्याने मारहाण VIDEO सुपरबग्जपासून संरक्षण कसं करावं? 1. सुपरबग टाळण्यासाठी साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुतले पाहिजेत. 2. हात स्वच्छ करण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापर करावा. 3. खाण्याचे पदार्थ स्वच्छ जागी ठेवावेत. 4. जेवण चांगल्या प्रकारे शिजवावं आणि त्यासाठी स्वच्छ पाण्याचा उपयोग करावा. 5. आजारी व्यक्तींच्या संपर्कात येण्याचं टाळा. 6. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच अँटिबायोटिक औषधांचा वापर करावा. 7. अँटिबायोटिक औषधं इतरांशी शेअर करू नयेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात