मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /आता लहान मुलांना विळख्यात घेतोय कोरोना; US-यूरोपमध्ये आठवडाभरात झालेली स्थिती चिंताजनक

आता लहान मुलांना विळख्यात घेतोय कोरोना; US-यूरोपमध्ये आठवडाभरात झालेली स्थिती चिंताजनक

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Coronavirus: अमेरिकेत सध्या आढळलेल्या एकूण संक्रमित रुग्णांपैकी 11 टक्के लहान मुलं आहेत. शाळांमध्ये सामुदायिक संसर्गाच्या प्रकरणांमुळे शिक्षक आणि मुलांना आयसोलेट करावं लागलं आहे.

नवी दिल्ली 09 डिसेंबर : गेल्या एका आठवड्यात अमेरिकेत 133,000 हून अधिक मुले कोरोनाच्या विळख्यात आल्याने एकच गोंधळ उडाला आहे (Coronavirus Cases are Increasing in Children's). अमेरिकन ऍकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि चिल्ड्रन्स हॉस्पिटल असोसिएशनने संयुक्त अहवाल जारी करून ही माहिती दिली आहे. आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की अमेरिकेत सध्या आढळलेल्या एकूण संक्रमित रुग्णांपैकी 11 टक्के लहान मुलं आहेत. शास्त्रज्ञ अँटनी फाउची यांनी अलीकडेच सांगितलं की, देशात ओमिक्रॉनशी (Omicron) संबंधित फारच कमी प्रकरणे नोंदवली जात आहेत, तरीही डेल्टा व्हेरिएंटमुळे (Delta Variant) संसर्ग पसरणं कायम आहे.

हेही वाचा - Omicron कोरोनाच्या इतर स्ट्रेनपेक्षा आहे वेगळा, या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

युरोपियन शाळांमध्ये कोरोना क्लस्टर्सची अनेक प्रकरणे आढळल्यानंतर चिंता वाढली आहे. ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, ग्रीससह अनेक देशांतील शाळांमध्ये सामुदायिक संसर्गाच्या प्रकरणांमुळे शिक्षक आणि मुलांना आयसोलेट करावं लागलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही युरोपीय देशांना शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून मोठ्या संख्येने मुलांना लवकरात लवकर लसीकरण करता येईल.

सिडनीतील रीजेंट्स पार्क ख्रिश्चन स्कूलमधील तीन मुलांमध्ये ओमिक्रॉनच्या संसर्गाची पुष्टी झाली आहे. यातील एका मुलाचा परदेश प्रवासाशी काहीही संबंध नाही. याच आधारावर शास्त्रज्ञांनी या घटनेचं वर्णन ओमिक्रॉनचे देशातील पहिले शालेय समुदाय संसर्ग प्रकरण म्हणून केलं आहे.

हेही वाचा - डेल्टाच्या तुलनेत किती घातक आहे Omicron? टॉप शास्त्रज्ञाने केला हा दावा

कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे ब्रिटनमध्ये समुदाय संसर्गाचा प्रसार झाल्यामुळे त्याचा परिणाम शाळांमध्येही दिसून येत आहे. ब्रिटीश शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की संसर्ग झालेल्या मुलांमध्ये ताप, खोकला ही लक्षणे दिसत नाहीत. तर त्यांच्या शरीरावर असामान्य रॅशेस येत आहेत.

First published:

Tags: Corona spread, Corona updates