Home /News /coronavirus-latest-news /

Omicron हा कोरोनाच्या इतर स्ट्रेनपेक्षा आहे वेगळा; या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

Omicron हा कोरोनाच्या इतर स्ट्रेनपेक्षा आहे वेगळा; या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

कोरोना विषाणू (coronavirus) संसर्गाची तीन मुख्य लक्षणे म्हणजे खोकला, उच्च ताप आणि चव आणि वास न येणं कमी होणं. परंतु जर तुम्हाला ओमिक्रॉन (Omicron) प्रकाराचा संसर्ग झाला असेल तर तुम्हाला काही वेगळी लक्षणं दिसू शकतात.

    नवी दिल्ली,08 डिसेंबर : कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) प्रकाराची लक्षणं इतर स्ट्रेनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहेत. त्यामुळं याच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तज्ज्ञांच्या मते, कोरोना विषाणू (coronavirus) संसर्गाची तीन मुख्य लक्षणे म्हणजे खोकला, उच्च ताप आणि चव आणि वास न येणं कमी होणं (Omicron symptoms) . परंतु जर तुम्हाला ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग झाला असेल तर तुम्हाला काही वेगळी लक्षणं दिसू शकतात. ही सामान्य सर्दीच्या लक्षणांसारखी असू शकतात, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. ओमिक्रॉन हा प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला होता. द सनच्या वृत्तानुसार, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, ओमिक्रॉन प्रकार ओळखणंदेखील कठीण आहे. कारण त्याची मुख्य लक्षणं इतर स्ट्रेनपेक्षा वेगळी आहेत. अल्फा, बीटा आणि डेल्टा स्ट्रेनच्या तुलनेत ओमिक्रॉन प्रकाराचा संसर्ग झाल्यावर तुम्हाला वेगवेगळी लक्षणं दिसतील. डॉक्टर म्हणतात की, या प्रकाराची मुख्य लक्षणं म्हणजे थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी. आतापर्यंत रुग्णांमध्ये चव आणि वास कमी झाल्याची कोणतीही नोंद नाही. तथापि, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, वेगवेगळ्या लोकांना या प्रकाराची लागण झाल्यास भिन्न लक्षणं दिसू शकतात. हे वाचा - Men’s Health: 30 वर्षांनंतर पुरुषांमध्ये या आजारांचा धोका वाढतो, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका झी न्यूज वृत्तानुसार दक्षिण आफ्रिकन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टर अँजेलिक कोएत्झी यांच्या मते, ओमिक्रॉन प्रकाराची मुख्य लक्षणं म्हणजे थकवा, अंगदुखी आणि डोकेदुखी. ही सामान्य सर्दीसारखी लक्षणं आहेत, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. तज्ज्ञांच्या मते, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तयार केलेल्या लसी ओमिक्रॉन स्ट्रेनवर प्रभावी आहेत की नाहीत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु असं मानलं जातं की, हा अधिक संसर्गजन्य असू शकतो. जगभरातील तज्ज्ञ अद्याप यावर संशोधन करत आहेत. हे वाचा - Health Tips : या वेळात स्प्राउट्स खाणे त्रासदायक ठरू शकते, जाणून घ्या योग्य पद्धत काही तज्ज्ञांचं मत आहे की, ओमिक्रॉन हा 'सौम्य आजारा'सारखा (mild disease) आहे आणि त्याची लक्षणे फार गंभीर नसतील. मात्र, तुम्हाला याचा संसर्ग झाला असेल तर, चाचणी करा आणि स्वतः विलगीकरणात जा. याच्यामुळं संक्रमणाचा प्रसार रोखण्यास मदत होईल.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या