नवी दिल्ली, 27 एप्रिल : अमेरिका, युरोपच्या तुलनेत दक्षिण आशियाई देशांमध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे, शिवाय हे देश गरीबही आहेत, असं असतानाही या देशांमध्ये कोरोनाव्हायरसचा कहर मात्र विकसित देशांपेक्षाही कमी आहे. दक्षिण आशियात कोरोनाव्हायरसची प्रकरणं आणि मृतांची संख्या विकसित देशांच्या तुलनेत कमी आहे.
जगातील जवळपास 23 टक्के लोकसंख्या दक्षिण आशियात आहे आणि सरासरी घनत्व 303 व्यक्ती प्रति किलोमीटर आहे. द वीकच्या रिपोर्टनुसार भारतात जवळपास 453 व्यक्ति प्रति वर्ग किमीमध्ये राहतात. तर बांग्लादेशमध्ये यापेक्षा तिप्पट प्रमाण आहे. मात्र अमेरिकेत 36, स्पेनमध्ये 96 आणि इटलीत 206 लोकं प्रति वर्गकिमीमध्ये राहतात.
तरीही अमेरिकेत सध्या भारतापेक्षा कोरोनाव्हायरसची प्रकरण 39 पटीने वाढलीत, तर फ्रान्समध्ये 7 पट, जर्मनीत 9 पट, इटलीत 11 पट जास्त प्रकरणं आहेत.
हे वाचा - कोरोनाच्या दहशतीत भारतीयांना दिलासा, इतर देशांच्या तुलनेत व्हायरस घेतोय कमी जीव
कोरोनाव्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूचा दरही असाच आहे. इटलीच्या तुलनेत भारतात 45 पट कमी मृत्यूदर आहे.
एका रिपोर्टनुसार, भारतात कोरोनाव्हायरसमुळे होणारा मृत्यूदर 3.1% आहे. मात्र अमेरिकेत 3.4%, स्पेनमध्ये 9.73%, इटलीत 12.72% आहे. जगभरात होणाऱ्या मृत्यूचा आकडेवारीचा विचार करता भारतात फक्त 0.3% मृत्यू आहेत आणि असाच ट्रेंड संपूर्ण आशियात आहे.
एप्रिलमध्ये असेच काही आकडे नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी ट्विटरवर पोस्ट केलेत. फक्त भारतच नव्हे तर नेपाळ, बांग्लादेश, अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका आणि मालदिवमध्येही अशीच आकडेवारी आहे. दाट लोकसंख्या असलेल्या दक्षिण आशियातील गरीब देशांमध्ये कोरोनाव्हायरसचा कहर कमी आहे.
वर्ल्ड मीटर्सच्या आकडेवारीनुसार 26 एप्रिलपर्यंत जगभरात एकूण 2,933,384 प्रकरणं आहेत आणि 203,612 मृत्यू झालेत.
त्यापैकी,
भारत : 26,496 प्रकरणं, 825 मृत्यू
पाकिस्तान : 12,723 प्रकरणं, 269 मृत्यू
बांग्लादेश : 5,416 प्रकरणं, 145 मृत्यू
श्रीलंका : 467 प्रकरणं, 7 मृत्यू
नेपाल : 51 प्रकरणं
मालदीव : 177 प्रकरणं
अफगाणिस्तान : 1,463 प्रकरणं, 47 मृत्यू
हे वाचा - पुण्यात कोरोनाचा चढता आलेख, मागील 6 दिवसांपासून असे वाढले रूग्ण
याचा अर्थ जगातील 20 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या दक्षिण आशियात जगभरातील कोरोना व्हायरसच्या एकूण प्रकरणांपैकी 1.3% प्रकरणं आणि मृत्यूंपैकी 0.6% मृत्यू आहेत.
यामागे नेमकी काय कारणं असू शकतात ते जाणून घेऊयात.
कमी प्रमाणात टेस्टिंग
द वीकच्या रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार अमेरिका, स्पेन आणि इटलीमध्ये जास्त प्रकरणं दिसून आलीत कारण या देशांमध्ये प्रति दहा लाख लोकसंख्येमागे अनुक्रमे 15 हजार, 19 हजार और 28 हजार टेस्ट करण्यात आले. या उलट भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानात अनुक्रमे 420, 654, 262 और 191 ही टेस्ट झालेत.
नागरिकांचं वय
लोली इन्स्टिट्युटच्या एका रिपोर्टनुसार दक्षिण आशियातील काही देशांमध्ये जगातील इतर देशांच्या तुलनते तरुणांची संख्या जास्त आहे. भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये 60 वर्षांपेक्षा कमी वय असलेली लोकसंख्या 5 ते 8 टक्के आहे आणि 70 पेक्षा जास्त वय असलेली लोकसंख्या फक्त 2 ते 3 टक्के आहे.
इटलीमध्ये 60 पेक्षा जास्त वय असलेली लोकसंख्या 16 टक्के आणि 70 पेक्षा जास्त वय असलेली लोकसंख्या 10 टक्के आहे. कोरोनामुळे झालेले 85 ते 90 टक्के मृत्यू 60 पेक्षा जास्त वयाच्या लोकांचा झाला आहे, हे स्पष्ट झालं आहे.
लसीकरण मोहीम
या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ज्या देशांमध्ये टीबी आणि मलेरियाची प्रकरणं जास्त आहेत. तिथं कोरोनाव्हायरसचं प्रमाण कमी असेल. अनेक तज्ज्ञांनीही असंच मानलं आहे. अमेरिकेच्या बायोटेक्नॉलॉजी सूचना केंद्राच्या एका अभ्यासात दिसून आलं की, ज्या देशांमध्ये बीसीजी लसीकरण मोहीम खूप आधी बंद झाली आहे, त्या देशांच्या तुलनेत हे लसीकरण आताही सुरू असलेल्या देशांमध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. इटलीमध्ये हे लसीकरणं कधीच झालं नाही.
तापमान
अभ्यासानुसार दक्षिण आशियाई देशांतील तापमानही कारण मानलं जातं आहे. ऊन, उकाडा आणि आद्रता अशा परिस्थिती कोरोनाव्हायरस कमी प्रमाणात दिसून आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या उपस्थितीत अमेरिकेच्या होमलँड सिक्युरीटी फॉर सायन्स अँड टेकच्या अंतर्गत सेक्रेटरीने 2 दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, की थेट उन्हात कोरोनाव्हायरस झपाट्याने मरतो. तसंच इजॉप्रॉपिल अल्कोहल या व्हायरसचा 30 सेकंदात नाश करू शकतो.
संकलन, संपादन - प्रिया लाड
हे वाचा - कोरोनाच्या लढ्यात मुंबई राज्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान, सरकार घेणार मोठा निर्णय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus