मुंबई 26 एप्रिल: राज्य सरकार कोरोनाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार काही थांबत नाही अशीच चिन्हे आहेत. यात मुंबई, पुणे, ठाणे ही महानगरे सरकारसाठी सगळ्यात जास्त चिंतेची बाब आहे. याच पट्ट्यात कोरोनाची रुग्णसंख्या झापाट्याने वाढत आहे. त्यामुळे याच हॉटस्पॉटमध्ये पूर्ण लक्ष केंद्रीत करण्याचं सरकारने ठरवलं असून येत्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्यात आज 440 नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या 8 हजार 68 झाली आहे. तर आज 112 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 1188 झाली आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 358 नवीन रूग्णांची नोंद झाली. विभागात 5407 एकूण रुग्ण झाले असून 204 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्त महिलेनं दिला बाळाला जन्म, VIDEO कॉलवर चिमुकल्याला बघते आई आज राज्यात 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबईतील 12 तर पुणे महापालिका क्षेत्रातील 3 जळगाव येथील 2 सोलापूर शहर आणि लातूर येथे प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एक लाख 16 हजार 345 रुग्णांची तपासणी केली असून त्यात एक लाख सात हजार 519 रुग्णांची तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे तर 8668 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत राज्यात सध्या 604 कंटेनमेंट जून असून 1603 सर्वेक्षण पथक काम करत आहे. पुण्यात कोरोनाचा चढता आलेख, मागील 6 दिवसांपासून असे वाढले रूग्ण तर देशात कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. रुग्ण वाढण्याचा दर कमी होत नाही. देशातील कोरोना रुग्णांची संख्या पोहचली 27 हजाराच्या जवळ. आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 26 हजार 917 एवढी झाली आहे. गेल्या 24 तासात 1 हजार 975 नवीन प्रकरणे तर 24 तासांत 47 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 826 एवढी झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.