पुणे, 17 जानेवारी : कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली त्याला आता दोन वर्षे झाली आहेत. 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लस देण्यात आली. आता बरोबर दोन वर्षांनी कोरोना लशीबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीने कोरोना लशीबाबत माहिती अधिकाराअंतर्गत सरकारकडून माहिती मागवली होती. सरकारने आरटीआयअंतर्गत धक्कादायक माहिती दिली आहे.
पुण्यातील व्यावसायिक प्रफुल्ल सारडा यांनी कोरोना लशीच्या दुष्परिणामाबाबत आरटीआयच्या माध्यमातून सरकारकडे माहिती मागितली. यावर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनाइझेशनने उत्तर दिलं आहे. ICMR-CDSCO ची उत्तरे अत्यंत धक्कादायक असल्याचं सारडा म्हणाले.
भारतात कोणकोणत्या कोरोना लशी दिल्या जातात?
अॅस्ट्राझेनका आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युची कोव्हिशिल्ड
पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटची कोव्होव्हॅक्स
हैदराबादमधील भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन
हैदराबादच्या डॉ. रेड्डी लॅबमार्फत मिळत असलेली रशियाची स्पुतनिक V
बायोलॉजिकल ई लिमिटेड ची कोर्बेव्हॅक्स
अहमदाबादच्या कॅडिला हेल्थकेअर लिमिटेडची ZyCov-D (फक्त 12-17 वयोगटातील मुलांसाठी)
हे वाचा - चीनने पूर्ण जगाची चिंता वाढवली; कोरोनाने 5 आठवड्यात 9 लाख लोकांचा मृत्यू, खरे आकडे हादरवणारे
कोणत्या लशीचे किती आणि कोणते दुष्परिणाम आहेत ते पाहुयात.
कोव्हिशिल्ड
इंजेक्शन दिलेल्या जागी सूज, वेदना, लालसरपणा
कोणत्या कारणाशिवाय उलटी होणं
वारंवार ओटीपोटात तीव्र वेदना
उलटी किंवा उलटीशिवाय डोकेदुधी
श्वास घ्यायला त्रास
छातीत वेदना
हातापायांना सूज, वेदना
शरीराचा एखादा भाग लकवाग्रस्त होणं
डोळ्यात वेदना
सिझर
डोळ्यांनी धूरसर दिसणं
मानसिक परिस्थितीत बदल
कोव्होवॅक्स
इंजेक्शन दिलेल्या जागी सूज, वेदना, जडसरपणा, लालसरपणा, खाज, रॅशेस
थकवा
डोकेदुखी
ताप
स्नायूंमध्ये वेदना
सांधेदुखी
मळमळ, उलटी
अंगदुखी, पायात वेदना
अशक्तपणा
लिम्प नोड वाढणं
पाठदुखी
चक्कर येणं.
कोव्हॅक्सिन
इंजेक्शन दिलेल्या जागेवर सूज, वेदना
डोकेदुखी
थकवा
ताप
अंगदुखी
ओटीपोटात वेदना
मळमळ, उलटी
चक्कर, गरगरल्यासारखं होणं
घाम येणं
सर्दी-खोकला
स्पुतनिक व्ही
इंजेक्शन दिलेल्या जागेवर वेदना, सूज
थंडी लागणे
ताप
डोकेदुखी
सांधे धरून येणं
सांध्यात वेदना
अस्वस्थ वाटणं
मळमळ
भूक न लागणं
लिम्प नोड वाढणं
अपचनासारख्या समस्या
कोर्बोव्हॅक्स
ताप
डोकेदुखी
थकवा
अंगदुखी
मळमळ
थंडी
अशक्तपणा, सुस्तपणा
इंजेक्शन दिलेल्या जागेवर वेदना, सूज, रॅश
त्वचेवर रॅशेस
सारडा म्हणाले, "लसीकरण पूर्णपणे ऐच्छिक आहे, असं सरकारने जारी केलं तरी बस, ट्रेन, विमान, आंतरराज्यीय प्रवास, हॉटेल, रेस्टॉरंट, मल्टिप्लेक्स, मॉल्स इत्यादी ठिकाणी लसीकरणाशिवाय लोकांना जाण्यावर बंदी होती. अप्रत्यक्षरित्या सरकारने लस घेणं बंधनकारकच केलं होतं. यामुळे दुष्परिणाम न जाणता लोकांनी लशी घेतल्या"
या सर्व संभाव्य दुष्परिणामांची पुरेशी प्रसिद्धी माध्यमांद्वारे, रुग्णालये, लसीकरण केंद्रांद्वारे केली गेली आहे की नाही आणि आरोग्य मंत्रालयाने लशीमुळे होणार्या मृत्यूंबद्दल लोकांसाठी सार्वजनिक सुरक्षा मोहिमा सुरू केल्या आहेत का, याची आकडेवारी जाहीर करण्याचे त्यांनी सरकारला आवाहन केले.
दरम्यान याबाबत सरकारने सांगितलं की, "किमान 50-60 टक्के परिणामकारकता दर्शविणाऱ्या लस कंपन्यांचा विचार केला जाईल. असं सर्व जागतिक एजन्सींनी बेंचमार्क सेट केला आहे. 2 किंवा 3 महिन्यांच्या निरीक्षणाच्या अल्प कालावधीत बहुतेक लशींनी 70-90 टक्के परिणामकारकता दर्शविली आहे. 100 कोटींहून अधिक लोकांना COVID-19 लशीचा किमान एक डोस मिळाला आहे आणि दुष्परिणामांचे प्रमाण खूपच कमी आहे"
"सुरुवातीच्या मोफत सामूहिक लशीकरण पूर्ण झाल्यानंतर ऑगस्ट 2022 पासून सरकारने कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लस बाजारात विकण्यास सशर्त परवानगी दिली आहे. तर इतर स्पुतनिक V आणि कोर्बेवॅक्स प्रतिबंधित आणीबाणीच्या वापरासाठी राहतील", असं सरकारने सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.