मुंबई, 15 जानेवारी : पाठीच्या दुखण्याने कित्येक लोक हैराण आहेत. काही केल्या पाठीतील वेदना काही कमी होत नाही. किती तरी उपाय करून पाहिले तरी त्याचा परिणाम दिसून येत नाही. पण आता तज्ज्ञांनी फक्त एका कागदाच्या तुकड्याने पाठीच्या वेदना दूर कशा करायच्या याचा उपाय सांगितला आहे. आता कागदाने पाठदुखी कशी काय दूर करता येईल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
पाठदुखीची बरीच कारणे आहेत. या कारणांनुसार त्यावर वेगवेगळे उपाय असतात. पण काही लोक पाठदुखीला सामान्य समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पेनकिलर किंवा वरून मलम लावून तात्पुरता आराम मिळतो. पण पाठदुखी कायमची दूर होते असं नाही. त्यासाठी कारणांनुसार औषधोपचार करावेच लागतात. पण औषधोपचारांशिवाय ज्योतिषतज्ज्ञांनीही पाठदुखीवरील अनोखा उपाय सांगितला आहे.
हे वाचा - टेलिपॅथी खरोखर शक्य आहे का? सुप्त मनाद्वारे मॅसेज कसा लांबपर्यंत पाठवतात?
ज्योषितज्ज्ञ स्नेहा जैन यांनी द होप टॅरोट या आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आता हा उपाय नेमका आहे काय आणि कसा करायचा ते पाहुयात.
स्नेहा जैन यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत एका कागदावर एक चिन्हं रेखाटून दाखवलं आहे. एका कोऱ्या कागदावर तुम्हाला असं चिन्हं काढायचं आहे आणि हा कागद तुम्ही झोपत असलेल्या गादीखाली 21 दिवस ठेवायचा आहे. यामुळे तुम्हाला पाठदुखीपासून आराम मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे.
हे वाचा - Weight Loss Tips : घरातील फरशी पुसताना कमी होईल वजन, साफसफाई करताना करा या एक्सरसाइज
हा उपाय ज्योतिष तज्ज्ञांनी सुचवलेला आहे. न्यूज 18 लोकमत याचं समर्थन करत नाही किंवा याची हमी देत नाही. तसा या उपायामुळे तुम्हाला काही हानी पोहोचणारी नाही त्यामुळे हा उपाय करून पाहण्यास हरकत नाही.
View this post on Instagram
तुम्ही हा उपाय करून पाहिल्यानंतर याचा काय परिणाम दिसून आला ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन नक्की सांगा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.