जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / चीनने पूर्ण जगाची चिंता वाढवली; कोरोनाने 5 आठवड्यात 9 लाख लोकांचा मृत्यू, खरे आकडे हादरवणारे

चीनने पूर्ण जगाची चिंता वाढवली; कोरोनाने 5 आठवड्यात 9 लाख लोकांचा मृत्यू, खरे आकडे हादरवणारे

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; रुग्णालये, स्मशानांमध्ये मृतदेहांचा खच

चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; रुग्णालये, स्मशानांमध्ये मृतदेहांचा खच

अहवालात असं आढळून आलं की जानेवारीच्या मध्यापर्यंत 64 टक्के लोकसंख्येला संसर्ग झाला होता. 0.1 टक्के मृत्यू दराच्या आधारे गेल्या पाच आठवड्यांत 900,000 लोक मरण पावले असतील असा त्यांचा अंदाज आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बीजिंग 17 जानेवारी : कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंबाबत चीनमधून धक्कादायक अहवाल समोर आला आहे. तज्ञांनी सांगितलं की चीनने सध्याच्या उद्रेकाच्या पहिल्या पाच आठवड्यांमध्ये सुमारे 60,000 कोविड-संबंधित मृत्यूची नोंद केली आहे, जी जगातील आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. नॅशनल हेल्थ कमिशनने या आठवड्याच्या शेवटी उघड केलं की डिसेंबरच्या सुरुवातीला चीनमध्ये कोरोना प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे12 जानेवारीपर्यंत देशातील रुग्णालयांमध्ये 59,938 जणांचे कोरोनाने मृत्यू झाले. मात्र चीनने हा आकडा फार कमी सांगितला असल्याचा खुलासा झाला आहे. चीनमध्ये कोरोनाचा कहर! 35 दिवसांत तब्बल 60 हजार लोकांचा मृत्यू, WHOच्या टीकेनंतर सरकार नमलं अधिकृत आकडेवारीने यापूर्वी नोंदवलेल्या मृत्यूंच्या संख्येत कमी आली असल्याने जागतिक आरोग्य संघटनेसह देश-विदेशातही यावर व्यापक टीका झाली. तज्ञांचं म्हणणं आहे की प्रादुर्भावाच्या तीव्र प्रमाणात आणि सुरुवातीला शून्य कोविड धोरण स्वीकारलेल्या इतर देशांमध्ये दिसलेल्या ओमिक्रॉनच्या मृत्यूची संख्या पाहता हे आकडे कमी दाखवले गेल्याची शक्यता आहे. हा आकडा देशाच्या रुग्णालयांतून आलेल्या अंदाजाशी सुसंगत असला तरी, देशभरातील एकूण कोविड मृत्यूंचा हा फक्त एक छोटा भाग असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. पेकिंग युनिव्हर्सिटीच्या नॅशनल स्कूल ऑफ डेव्हलपमेंटचा वापर करून दिलेल्या अहवालात असं आढळून आलं की जानेवारीच्या मध्यापर्यंत 64 टक्के लोकसंख्येला संसर्ग झाला होता. 0.1 टक्के मृत्यू दराच्या आधारे गेल्या पाच आठवड्यांत 900,000 लोक मरण पावले असतील असा त्यांचा अंदाज आहे. याचा अर्थ असा आहे की प्रादुर्भावाच्या वेळी रूग्णालयात झालेल्या एकूण मृत्यूची देण्यात आलेली संख्या ही प्रत्यक्ष आकड्याच्या 7 टक्क्यांपेक्षा कमी आहे. Diabetes Diet : डायबिटीज रुग्णांनी हिवाळ्यात खायला हवेत हे 5 पदार्थ; शुगर नियंत्रणात राहिल ब्लूमबर्गच्या विश्लेषणानुसार, अधिकृत आकडेवारी असं दाखवते, की पाच आठवड्यांत देशातील प्रत्येक दहा लाख लोकांमागे दररोज 1.17 मृत्यू होतात. सुरुवातीला झिरो कोविड धोरणाचा पाठलाग करणार्‍या किंवा कोरोना नियम शिथिल केल्यानंतरही व्हायरस नियंत्रणात ठेवू शकणाऱ्या इतर देशांमधील सरासरी दैनंदिन मृत्यू दरापेक्षा हे खूपच कमी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात