मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

ICU मध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना किडनी फेल होण्याचा धोका अधिक, अमेरिकेच्या संशोधनात माहिती समोर

ICU मध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना किडनी फेल होण्याचा धोका अधिक, अमेरिकेच्या संशोधनात माहिती समोर

कोरोनातून (Corona Virus) बरे झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत काही समस्या उद्भवत असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनातून (Corona Virus) बरे झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत काही समस्या उद्भवत असल्याची माहिती समोर येत आहे.

कोरोनातून (Corona Virus) बरे झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत काही समस्या उद्भवत असल्याची माहिती समोर येत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

वॉश्गिंटन, 16 सप्टेंबर: कोरोनातून (Corona Virus) बरे झालेल्या रुग्णांच्या प्रकृतीत काही समस्या उद्भवत असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनामधून (Corona) बरे झालेल्या रुग्णांची किडनी (Kidney) खराब होत असून रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकराची लक्षणे दिसून येत नसल्याचं समजतंय. अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधनात हा दावा करण्यात आला आहे. कोरोनाचे जे रुग्ण रुग्णालयात दाखल झाले किंवा ज्यांना सौम्य लक्षणे दिसली त्यांना किडनी खराब होण्याचा धोका आहे (शेवटच्या टप्प्यातील किडनी रोग), असं संशोधनात म्हटलं आहे.

1 सप्टेंबर रोजी अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, कोरोनामधून बरे झालेले रुग्ण ज्यांना धमन्यांशी संबंधित समस्या होत्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना किडनीचे आजार सुरू झाले. वॉशिंग्टन विद्यापीठाचे संशोधक झियाद अल-अली यांच्या मते, संसर्ग झाल्यानंतर आयसीयूमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना किडनी निकामी होण्याचा जास्त धोका असतो.

झुंज यशस्वी! तब्बल 130 दिवसांचा कोरोना, रुग्ण सांगतोय अनुभव

सेंट लुईस हेल्थ केअर सिस्टम आणि वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी अमेरिकेतील फेडरल हेल्थ डेटाचे विश्लेषण केले. किडनी खराब होण्याचे कारण लाँग कोविड असल्याचे अहवालातून समोर आले आहे. किडनीचे रुग्णांमध्ये सहसा त्याची लक्षणे दाखवत नसल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. नॅशनल किडनी फाउंडेशनच्या मते, सुमारे 90 टक्के रुग्णांमध्ये किडनीच्या आजाराची लक्षणे दिसत नाहीत. 3.7 कोटी अमेरिकन या परिस्थितीशी झगडत आहेत.

किडनीच्या रुग्णांमध्ये, 70 ते 80 टक्के किडनी हळूहळू काम करणं थांबवते, तोपर्यंत रुग्णांना ते समजत नाही, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्याच्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. उदाहरणार्थ, लघवीमध्ये प्रोटीनची वाढलेली पातळी, पाय, घोट्या (Ankle) आणि डोळ्यांभोवती सूज, छातीत दुखणे आणि श्वासोच्छवास.

चालत्या-फिरत्या बाईकच्या पेट्रोल टाकीचा स्फोट, चालक गंभीर जखमी 

घरी कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांना किडनी निकामी होण्याचा धोका 23% जास्त

काही दिवसांपूर्वी असाच एक रिसर्च समोर आला होता. कोरोनातून बरे झालेले रुग्ण आता नव्या समस्येला सामोरे जात आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, अशा रुग्णांची किडनी खराब होत असल्याची बातमी आहे आणि एकदम शेवटच्या टप्प्यांत याचा उलगडा होत आहे. (Post COVID19 Kidney Failure)

एनबीटीच्या रिपोर्टमध्ये असं लिहिण्यात आलं आहे की, अशी प्रकरणे केवळ त्या रुग्णांमध्ये दिसत नाहीत ज्यांना कोविडच्या गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान ही समस्या त्या लोकांमध्ये देखील दिसून येत आहे जे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये (Post COVID19) राहून कोविडपासून बरे झाले आहेत.

बलात्कारपीडित विद्यार्थिनीनं आयुष्याचा केला भयावह शेवट; नागपुरातील मन हेलावणारी घटना 

अहवालानुसार, अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजीच्या जर्नलमध्ये असे म्हटले आहे की, किडनीचा हा परिणाम अशा रुग्णांमध्येही दिसून आला आहे ज्यांना यापूर्वी किडनीची कोणतीही समस्या नव्हती. अशा रुग्णांमध्ये, कोविडपासून किडनी निकामी होण्याचा धोका दोन पटीने वाढला आहे.

First published:

Tags: Corona virus in india, Coronavirus