जाहिरात
मराठी बातम्या / देश / चालत्या बाईकच्या पेट्रोल टाकीचा स्फोट, बाईक चालक गंभीर जखमी

चालत्या बाईकच्या पेट्रोल टाकीचा स्फोट, बाईक चालक गंभीर जखमी

चालत्या बाईकच्या पेट्रोल टाकीचा स्फोट, बाईक चालक गंभीर जखमी

पंजाबमध्ये (Punjab) फाजिल्का जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

चंदीगड, 16 सप्टेंबर: पंजाबमध्ये (Punjab) फाजिल्का जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. बुधवारी संध्याकाळी बाईकचा पेट्रोलचा टँकचा (Bike Fuel Tank) स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. या दुर्घटनेत बाईक चालक गंभीर (Biker) जखमी झाला आहे. जलालाबादमध्ये (Jalalabad) ही धक्कादायक घटना घडली. ही माहिती देताना पोलिसांनी सांगितलं की, सध्या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जाहिरात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. जेव्हा बाईक चालक जुनी भाजी मंडईहून बँक रोडच्या दिशेनं जात होता. एनआयआय वृत्तसंस्थेनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. त्यासोबतच या स्फोटाचे फोटो देखील ट्विट केले आहेत. या फोटोतूनच स्फोटाची तीव्रता दिसून येत आहे. हेही वाचा-  बलात्कारपीडित विद्यार्थिनीनं आयुष्याचा केला भयावह शेवट; नागपुरातील मन हेलावणारी घटना जेव्हा बाईक चालक बँकेजवळ पोहोचला.तेव्हा बाईकच्या पेट्रोलच्या टाकीचा स्फोट झाला. ती टाकी फुटली. त्यामुळे बाईक चालक जखमी झाला. या घटनेनंतर बाईक चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात