बलात्कारपीडित विद्यार्थिनीनं आयुष्याचा केला भयावह शेवट; नागपुरातील मन हेलावणारी घटना

बलात्कारपीडित विद्यार्थिनीनं आयुष्याचा केला भयावह शेवट; नागपुरातील मन हेलावणारी घटना

Crime in Nagpur: अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

  • Share this:

नागपूर, 16 सप्टेंबर: मागील काही दिवसांत महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या (crime against woman)अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मुंबईतील साकीनाका याठिकाणी महिलेवर अमानुष बलात्कार करून तिची निर्घृण हत्या (Rape and murder in mumbai) केल्याची घटना ताजी असताना, नागपुरात आणखी एक अल्पवयीन मुलगी अत्याचाराची बळी ठरली आहे. सोमवारी दुपारी घरात कुणीही नसताना बलात्कार पीडित विद्यार्थिनीनं आपल्या आयुष्याचा शेवट (Minor rape victim commits suicide) केला आहे. संबंधित घटना नागपूर येथील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

नेमकी घटना काय आहे?

17 वर्षीय पीडित मुलगी इयत्ता अकरावीला शिकत होती. काही दिवसांपूर्वी 20 वर्षीय आरोपी विकास भुजाडे यानं पीडितेला लग्नाचं आमिष दाखवून घरातून पळवून नेलं होतं. आरोपी भुजाडे हा पीडित विद्यार्थिनीचा नातेवाईक आहे. जून महिन्यात पीडितेला घरातून पळवून नेल्यावर आरोपी तिला बंगळुरूला घेऊन गेला होता.

हेही वाचा-'कपडे काढ, नाक घास, झाडू मार...', महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा छळ, शिक्षकाला अटक

पीडित मुलगी अचानक घरातून बेपत्ता झाल्यानं नातेवाईकांनी जरीपटका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी तपासाची चक्र फिरवली असता, आरोपी विकास हा बंगळुरूला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी बंगळुरूला जाऊन आरोपी विकासला ताब्यात घेतलं आणि पीडित मुलीची सुटका केली. पण संशयित आरोपी विकासनं तिचं लैंगिक शोषण केल्याचा खुलासा पोलीस तपासात झाला.

हेही वाचा-विधवेसोबत सेक्स करताना केलं डिस्टर्ब; भूकेनं व्याकूळ आजीला निर्दयीपणे संपवलं

या संबंधातून पीडित मलगी गर्भवती देखील राहिली होती. पण नातेवाईंकाच्या संमतीनं पीडितेचा गर्भपात करण्यात आला होता. या घटनेनंतर पीडित मुलगी मागील काही दिवसांपासून तणावात होती. दरम्यान सोमवारी दुपारी घरात कुणी नसताना पीडित मुलीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे. तिने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली अद्याप स्पष्ट झालं नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Published by: News18 Desk
First published: September 16, 2021, 11:11 AM IST

ताज्या बातम्या