• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • आता श्वासासाठी लढावं लागणार नाही! तुम्हालाही सहजपणे मिळणार कोरोना संजीवनी; 2DG औषध बाजारात

आता श्वासासाठी लढावं लागणार नाही! तुम्हालाही सहजपणे मिळणार कोरोना संजीवनी; 2DG औषध बाजारात

डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने (Dr. Reddy's Laboratory) 2 डीऑक्सी डी ग्लुकोज (2-deoxy-2-glucose) अर्थात 2DG औषधाच्या व्यावसायिक उपलब्धतेची (Commercial Launch) घोषणा केली आहे.

  • Share this:
हैदराबाद, 28 जून: कोरोना (Corona) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने (Second Wave) देशाला खूप मोठा फटका बसला आहे. ही लाट आता ओसरत असल्याचं चित्र असलं, तरी तिसरी लाट येण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी (Dr. Reddy's Laboratory) या औषध कंपनीने 2 डीऑक्सी डी ग्लुकोज (2-deoxy-2-glucose) अर्थात 2DG या कोविडवरच्या औषधाच्या व्यावसायिक उपलब्धतेची (Commercial Launch) घोषणा केली आहे. संरक्षण संशोधन विकास संघटना अर्थात DRDO आणि नवी दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (इन्मास - INMAS) या संस्थांच्या सहयोगाने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीने हे औषध विकसित केलं आहे. हे औषध हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या कोविड रुग्णांना दिल्यास त्यांच्या आजाराची गंभीरता लवकर कमी होण्यास आणि कृत्रिम ऑक्सिजनवरचं (Medical Oxygen) अवलंबित्व कमी करण्यास मदत करतं. मध्यम ते गंभीर स्वरूपाच्या रुग्णांवर हे औषध प्रभावी ठरतं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान एप्रिल-मे महिन्यात कृत्रिम ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक रुग्णांचा बळी गेला होता. त्या पार्श्वभूमीवर या औषधाची उपलब्धता महत्त्वाची ठरणार आहे. कमर्शियल लाँचमुळे हे औषध कोणालाही विकत घेता येणार आहे. हे वाचा - डेल्टा+ व्हेरिअंट देशासाठी किती घातक? CSIRच्या शास्त्रज्ञांचा दिलासादायक अहवाल हे औषध ग्लुकोजपासून तयार केलं जातं. कॅन्सरच्या रुग्णांवरही एक सपोर्टिव्ह औषध (Supportive Medicine) म्हणून त्याचा वापर केला जातो. शरीरातलं मेटॉबॉलिझम (Metabolism) अर्थात चयापचय क्रियेवर या औषधाचा परिणाम होतो. याद्वारे ग्लायकोलायसिसच्या क्रियेमध्ये अडथळा आणला जातो. त्यामुळे पेशींमध्ये ग्लुकोजनिर्मिती होण्यावर निर्बंध येतात. कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर पेशींमध्ये ग्लुकोजचं प्रमाण वेगाने वाढतं. या प्रक्रियेची गती कमी केली गेली, तर विषाणूचा संसर्ग वाढण्यातही अडथळा निर्माण होऊ शकतो. अभ्यासात असं लक्षात आलं, की ज्या पेशींमध्ये कोरोना विषाणूचं अस्तित्व असेल, त्याच पेशींना या औषधाकडून लक्ष्य केलं जातं. त्या पेशींमध्ये जाऊन अतिरिक्त ग्लुकोजची (Glucose) निर्मिती होण्यावर हे औषध निर्बंध आणतं आणि त्यामुळे विषाणूची संख्या वाढण्यावरही बंधनं येतात. आतापर्यंतचा वापर आतापर्यंत कोणत्याही आजाराच्या उपचारांमध्ये 2-डीजी या औषधाचा वापर मुख्य औषध म्हणून करण्यात आलेला नाही. कॅन्सर (Cancer) रुग्णांवरच्या 200हून जास्त क्लिनिकल ट्रायल्समध्ये या दुय्यम किंवा सपोर्टिव्ह औषध म्हणून या औषधाचा वापर केल्याचं सांगितलं जातं. गेल्या वर्षभरात जगभरात वेगवेगळ्या जर्नल्समध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनांमध्ये थेरपीच्या रूपाने 2-डीजी या औषधाच्या संभाव्य उपयुक्ततेबद्दल चर्चा करण्यात आली आहे; मात्र हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर याचा वापर केल्याबद्दलचा मात्र कोणताही अहवाल अद्याप प्रसिद्ध झालेला नाही. हे वाचा - सावध व्हा! 13 वर्षाच्या मुलामध्ये आढळला मेंदूवर परिणाम करणारा कोरोना 2-डीजी या औषधाच्या प्री-क्लिनिकल ट्रायल्स एप्रिल 2020मध्ये झाल्या. हे औषध कोरोना विषाणूविरोधात कसं काम करतं, हे त्या प्री-क्लिनिकल ट्रायल्समध्ये दिसलं. मे ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत 17 हॉस्पिटल्समधल्या 110 कोरोना रुग्णांवर या औषधांच्या क्लिनिकल ट्रायल्स घेण्यात आल्या. डिसेंबर 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 27 हॉस्पिटल्समधल्या 220 रुग्णांवर तिसऱ्या टप्प्यातल्या ट्रायल्स घेतल्या गेल्या. DRDO आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने या ट्रायल्स घेण्यात आल्या होत्या. कोरोनावरच्या भारतात विकसित केल्या गेलेल्या या औषधाच्या पहिल्या बॅचचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी 17 मे 2021 रोजी केलं. मध्यम ते तीव्र स्वरूपाचा कोविड असलेल्या रुग्णांमध्ये त्या औषधाचा आपत्कालीन स्थितीत वापर करण्याकरिता औषध महानियंत्रकांनी (DCGI) एक मे रोजी परवानगी दिली होती. हे वाचा - मुंबईकरांनो; आजपासून असे असतील नियम, घराबाहेर पडण्याआधी नक्की वाचा सरकारच्या म्हणण्यानुसार, टू-डीजी हे जेनेरिक औषध असून, ग्लुकोजचा अॅनालॉग आहे. त्यामुळे ते सहज तयार करता येऊ शकतं आणि मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देता येऊ शकतं.
First published: