जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत आजपासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू, 4 वाजेपर्यंतच दुकानं सुरु

मुंबईत आजपासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू, 4 वाजेपर्यंतच दुकानं सुरु

मुंबईत आजपासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू, 4 वाजेपर्यंतच दुकानं सुरु

Mumbai Restrictions:मुंबईमधील कोरोना संसर्गाचा आढावा घेत लेवल 3 च्या नियमांची अंमलबजावणी केली गेली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 जून: कोविड 19च्या डेल्टा (Delta variant of Coronavirus) आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे (Delta Plus Variant of Coronavirus) राज्यभरात नव्याने निर्बंध आणि मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. आजपासून पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू झाले आहेत. संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने प्रतिबंधात्मक सूचना आणि नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार ‘ब्रेक द चेन’ (Break the Chain) अंतर्गत 4 जून 2021 पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधात विस्तार करण्यात आला आहे. त्यात मुंबईचा (Mumbai)समावेश लेवल 3मध्ये झाला आहे. मुंबईमधील कोरोना संसर्गाचा आढावा घेत लेवल 3 च्या नियमांची अंमलबजावणी केली गेली आहे. मुंबई महानगरपालिकेने (Brihanmumbai Municipal Corporation )नवी नियमावली जाहीर केली आहे. सध्या मुंबईचा कोरोना संसर्ग दर 3.96 टक्के असून कोरोना वाढीचा दर 0.09 टक्के आहे. आज पासून लेवल ३ चे नियम लागू होत आहेत. हेही वाचा-  बोगस आयकार्ड बनवून लोकलनं प्रवास करताय?, होऊ शकते मोठी कारवाई मुंबईतील तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध काय? अत्यावश्यक दुकाने -दररोज सकाळी 7 ते दुपारी 4 इतर दुकाने- सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 खुली राहातील. ही दुकाने शनिवारी आणि रविवारी बंद असतील. मॉल, थिएटर पूर्णपणे बंद राहतील. हॉटेल- सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के खुली राहातील. त्यानंतर पार्सल सुविधा देता येईल. हॉटेल शनिवारी व रविवारी बंद राहातील. रेल्वेसेवा- सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहील. मॉर्निंग वॉक, मैदाने, सायकल चालविण्यासाठी पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत मुभा. मनोरंजन कार्यक्रम-50 टक्के आसनव्यवस्थेसह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत. लग्नसोहळे- 50 टक्के क्षमतेने तर, अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी 20 व्यक्तींना मुभा. खासगी कार्यालये -50 टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहातील. सरकारी कार्यालये-50 टक्के क्षमतेने सुरू राहातील. आऊटडोअर क्रीडा- पहाटे 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 9. स्टुडिओत चित्रीकरणास परवानगी. बांधकाम- दुपारी 4 वाजेपर्यंत मुभा कृषी- सर्व कामांना मुभा. ई कॉमर्ससाठी परवानगी.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात