• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • डेल्टा प्लस व्हेरिअंट देशासाठी किती घातक? CSIRच्या शास्त्रज्ञांचा दिलासादायक अहवाल

डेल्टा प्लस व्हेरिअंट देशासाठी किती घातक? CSIRच्या शास्त्रज्ञांचा दिलासादायक अहवाल

Corona Virus Variant: कोरोना विषाणूचा डेल्टा प्लस व्हेरिअंट (Delta+ variant) अत्यंत घातक असल्याचा दावा केला जात आहे. पण याबाबत दिलासा देणारा अहवाल सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारला दिला आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जून: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd Wave) ओसरत आहेत. देशात कोरोनाबाधित रुग्णांचा (Corona cases) आकडाही कमी झालेला दिसत आहे. पण देशासमोर आता कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा (Corona 3rd wave alert) धोका वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिअंट (Corona virus new variant) अर्थातच डेल्टा प्लस व्हेरिअंट (Delta+ variant) अत्यंत घातक असल्याचा दावा केला जात आहे. पण याबाबत दिलासा देणारा अहवाल सीएसआयआरच्या शास्त्रज्ञांनी केंद्र सरकारला दिला आहे. कोरोना विषाणूचा डेल्टा प्लस व्हेरिअंट लहान मुलांसाठी घातक नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत असल्यानं राज्यसरकारनं पुन्हा एकदा लॉकडाऊन निर्बंध आणायला सुरुवात केली आहे. राज्यातील अनेकांनी डेल्टा प्लस व्हेरिअंटचा धसका घेतला असून समाजात भीतीचं वातावरण आहे. पण हा कोराना विषाणूचा नवीन व्हेरिअंट धोकादायक नसल्याचा अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आला आहे. डेल्टा किंवा डेल्टा प्लस व्हेरिअंट खरंच धोकादायक आहे का? याबाबत CSIRचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांनी झी24तास ला दिलासादायक प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. शेखर मांडे यांच्या मते, डेल्टा प्लस व्हेरिअंट धोकादायक नाही. या व्हेरिअंटचा लहान मुलांवर कोणताही परिणाम होत नसल्याची माहितीही डॉ. मांडे यांनी दिली आहे. याबाबतची माहिती देताना त्यांनी सांगितलं की, कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिअंटवर CSIRच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आहे. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिअंट घातक नसून घाबरण्याचं काहीही कारण नसल्याची त्यांनी म्हटलं आहे. पण नेहमीप्रमाणे मास्क परिधान करणं आणि सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा-सावध व्हा! 13 वर्षाच्या मुलामध्ये आढळला मेंदूवर परिणाम करणारा कोरोना डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिअंट घातक असल्याचा कोणताही पुरावा शास्त्रज्ञांना आढळला नाही. CSIR अर्थातच विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषदेनं हे संशोधन केलं आहे. महाराष्ट्रात केवळ दोन जिल्ह्यातच डेल्टा प्लस व्हेरिअंट आढळला असल्याचं डॉ. मांडे यांनी सांगितलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: