जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / कोरोना बळावतोय; रुग्णालयावरील ताण वाढत असल्याने चिंता वाढली

कोरोना बळावतोय; रुग्णालयावरील ताण वाढत असल्याने चिंता वाढली

कोरोना बळावतोय; रुग्णालयावरील ताण वाढत असल्याने चिंता वाढली

दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने बळावत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नरेंद्र मते, प्रतिनिधी/ वर्धा, 5 एप्रिल : सावंगी येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय आणि सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयाला कोविड रुग्णालय म्हणून जाहीर करण्यात आले. परंतु या दोन्ही रुग्णालयात जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील कोविडची सौम्य लक्षणे असलेली तसेच लक्षणविरहित शंभराहून अधिक रुग्ण दररोज दाखल केली जात आहे. इतकेच नव्हे तर नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आदी जिल्ह्यातील गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल केली जात आहेत. त्यामुळे सध्या वर्धा जिल्ह्यातील या दोन्ही कोविड रुग्णालयावर चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी ताण वाढला आहे. लक्षणविरहीत तसेच कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या व्यक्तीला कोविड केअर सेंटर तसेच गृह विलगिकरणात ठेवणे क्रमप्राप्त असतांना जिल्हा सामान्य रुग्णालयासह आर्वी तसेच हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयाकडून दररोज किमान शंभर लक्षण विरहित तसेच कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना सेवाग्राम किंवा सावंगी येथील कोविड रुग्णालयात हलविले जात आहे. त्यामुळं या दोन्ही रुग्णालयातील खाटा भरत आहे. हे ही वाचा- कोरोना महासाथीमुळे नाही झाली तपासणी; 27 वर्षीय महिलेचा दुर्देवी अंत विशेष म्हणजे हिंगणघाट व आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसीयू तसेच व्हेंटिलेटर खाटा असतानाही नाममात्र रूग्णांनाच या तिन्ही रुग्णालयात ठेवले जाते. तर मोठ्या प्रमाणात रुग्णांना रेफर केले जात असल्याने संकट काळात वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या या दोन्ही रुग्णालयातील अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. वर्धा आणि हिंगणघाट येथील शासकीय रुग्णालयाची जबाबदारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सचिन तडस यांच्यावर आहे. परंतु या तिन्ही रुग्णालयातील व्हेंटिलेटर सध्या धूळखात असल्याचे सांगण्यात येते. कोविड रुग्णालयात दाखल झालेले लक्षण विरहित तसेच कोविडची सौम्य लक्षणे असलेली रुग्ण बहुधा रुग्णालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. त्यामुळं स्वतः जीवाची पर्वा न करता गंभीर कोविड बाधितांचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत असल्याचे सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात