मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोना लशीचं कारण सांगून तरुणाची नसबंदी, काही महिन्यांपूर्वीच झालं लग्न

कोरोना लशीचं कारण सांगून तरुणाची नसबंदी, काही महिन्यांपूर्वीच झालं लग्न

शुद्धीवर आल्यानंतर तरुणाला आपली नसबंदी केल्याचं लक्षात आलं.

शुद्धीवर आल्यानंतर तरुणाला आपली नसबंदी केल्याचं लक्षात आलं.

शुद्धीवर आल्यानंतर तरुणाला आपली नसबंदी केल्याचं लक्षात आलं.

उदयपूर, 1 जानेवारी : उदयपुरमध्ये (Rajasthan News) कोरोनाची लस (Corona Vaccine) लावण्याचं कारण सांगून एका तरुणाची नसबंदी (Sterilization of a young man) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात भूपालपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसदेखील या प्रकरणात तपास करीत आहे. विवाहित असलेल्या या तरुणाला एकही मूल नाही. तरुणाने सांगितलं की, रुग्णालयात नेऊन त्याला इंजेक्शन देण्यात आलं. यानंतर नेमकं काय घडलं हेदेखील त्याला आठवत नाही. आपली नसबंदी झाल्याचं त्याचं नंतर लक्षात आलं.

मजूरीसाठी उभा होता, 2 हजारांचं दिलं आमिष..

या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 डिसेंबर रोजी हा तरुण मजुरीसाठी उभा होता. त्याने 2 हजार रुपयांचा आमिष दिलं आणि कोरोनाची लस देण्याच्या बहाण्याने स्कूटीवरुन पुलाच्या दिशेने एका रुग्णालयात बोलावलं. यानंतर त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं आणि नसबंदीचं ऑपरेशन केलं. यानंतर बहिणीच्या घरी सोडून 1100 रुपये देऊन निघून गेला.

हे ही वाचा-पहिल्या पतीला सोडून केलं दुसरं लग्न, फेसबुकवर तिसऱ्यासोबत जडलं प्रेम अन् हत्या..

आई म्हणाली, एकूलता एक मुलगा, नातूदेखील नाही...

तरुण आणि त्याच्या कुटुंबीय खूप त्रस्त आहेत. आरोपीवर कारवाईबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईने सांगितलं की, त्यांचा एकूलता एक मुलहा आहे, आणि सून आहे. नातूदेखील नाही. जसं आमच्यासोबत झालं तर इतर कोणासोबतही होऊ नये. या प्रकरणात पोलिसांकडून तपास सुरू आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccination