नवी दिल्ली 06 नोव्हेंबर : प्रदूषणात वाढ (Air Pollution) झाल्यामुळे कोरोनाचे रुग्ण (Corona Patients) पुन्हा वाढू शकतात. एम्सचे (AIIMS) संचालक डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले की, प्रदूषणामुळे श्वासोच्छवासाच्या समस्या वाढतात. विशेषत: ज्यांना आधीच फुफ्फुसाचा आजार किंवा दमा आहे, अशा लोकांच्या समस्या अधिक वाढतात. प्रदूषण आणि COVID-19 फुफ्फुसांवर परिणाम करतात. हवेतील प्रदूषणाची पातळी वाढल्याने हा आजार आणखी धोकादायक बनू शकतो. त्यामुळे रुग्णांचा मृत्यूही होऊ शकतो. डॉ रणदीप गुलेरिया यांनी 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.
दिवाळीच्या मुहूर्तावर फटाक्यांमुळे शुक्रवारी दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली. बंदी असतानाही दिल्लीत फटाके फोडण्यात आले. डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले, 'ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात हलके वारे वाहत असतात. फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामुळे आणि भुसभुशीत वायूमुळे प्रदूषित हवा जमिनीच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे, त्यामुळे प्रदूषणाची पातळी लक्षणीय वाढली आहे.
आता केवळ लस नाही तर गोळ्या घेऊन बरा होणार COVID,या देशाने सर्वप्रथम दिली मान्यता
ते म्हणाले की या काळात केवळ श्वासोच्छवासाची समस्या हीच गंभीर समस्या नाही. तर ज्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या आहेत आणि विशेषत: फुफ्फुसाच्या समस्या किंवा दमा आहे, अशा रुग्णांसाठी वायू प्रदूषण मोठा धोका बनू शकतो.
डॉ गुलेरिया म्हणाले की, दोन प्रकारच्या डेटाद्वारे हे कळते की कोविड-19 च्या रुग्णांसाठी प्रदूषण धोकादायक आहे. ते म्हणाले, 'एक डेटा सूचित करतो की जेव्हा हवेतील प्रदूषण वाढते, तेव्हा हा विषाणू जास्त काळ हवेत राहू शकतो. हा आजार नंतर हवेतून पसरणारा आजार होऊ शकतो. आणखी एक डेटा सूचित करतो की प्रदूषणामुळे फुफ्फुसाच्या समस्या वाढू शकतात.
कहर! जर्मनीत कोरोनाने तोडले सर्व रेकॉर्ड, 24 तासात अचानक वाढली रुग्णसंख्या
गुलेरिया म्हणाले की, वायू प्रदूषण मुलांच्या आरोग्यासाठीही घातक आहे. कोविड-19 पूर्वी आम्ही आपत्कालीन वॉर्डमध्ये दाखल झालेल्या रुग्णांवर अभ्यास केला होता. यावरून असे दिसून आले की, जेव्हा जेव्हा प्रदूषणाची पातळी वाढते तेव्हा रुग्णांना विशेषत: लहान मुलांना श्वसनाचा त्रास होतो आणि त्यांना आपत्कालीन वॉर्डात दाखल करावे लागते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.