मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कहर! जर्मनीत कोरोनाने तोडले सर्व रेकॉर्ड, 24 तासात अचानक वाढली रुग्णसंख्या

कहर! जर्मनीत कोरोनाने तोडले सर्व रेकॉर्ड, 24 तासात अचानक वाढली रुग्णसंख्या

जर्मनीत कोरोनानं पुन्हा (Corona outbreak in Germany news recoed of covid patients) डोकं वर काढलं असून गेल्या 24 तासात तब्बल 33,949 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

जर्मनीत कोरोनानं पुन्हा (Corona outbreak in Germany news recoed of covid patients) डोकं वर काढलं असून गेल्या 24 तासात तब्बल 33,949 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

जर्मनीत कोरोनानं पुन्हा (Corona outbreak in Germany news recoed of covid patients) डोकं वर काढलं असून गेल्या 24 तासात तब्बल 33,949 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

बर्लिन, 4 नोव्हेंबर: जर्मनीत कोरोनानं पुन्हा (Corona outbreak in Germany news recoed of covid patients) डोकं वर काढलं असून गेल्या 24 तासात तब्बल 33,949 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच नियंत्रणात आलेली कोरोनाची साथ पुन्हा (Rising corona in Germany) वाढत असल्याचं चित्र असून गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढणारी रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असल्याचं चित्र आहे.

अचानक वाढली रुग्णसंख्या

जर्मनीत रुग्णसंख्या वाढीचा वेग अस्वस्थ कऱणारा आहे. एका आठवड्यापूर्वी 28,037 जण एका दिवशी बाधित झाले होते. एकाच आठवड्यात हा आकडा कमालीचा वाढला असून आता गेल्या 24 तासांत 33,939 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जर्मनीतील 16 राज्यांच्या आरोग्य विभागाच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली असून सर्व आपातकालीन यंत्रणांना सक्रीय करण्यात आलं आहे.

थंडी आणि कोरोना

गेल्या काही दिवसांपासून जर्मनीतील तापमानात घट होत असून कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. हवामान बदलाच्या परिणाम अनेक नागरिकांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होत असतो. कोरोना रुग्णांच्या होणाऱ्या वाढीत या बाबीचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

वाढला मृत्यूंचाही आकडा

जर्मनीत गेल्या आठवड्यात एका दिवशी झालेल्या सर्वाधिक मृत्यूंची संख्या होती 126. हाच आकडा आता 165 वर पोहोचला आहे. जर्मनीत कोरोनामुळे जीव गमावलेल्यांची संख्या आता 96,192 झाली आहे.

हे वाचा- दिवाळीच्या पहिल्या दिवशी Good News, 'या' सिंगल लसीचा डोस करतोय Coronaचा धोबीपछाड

लसीकरणाचा वेग वाढवणार

जर्मनीत आतापर्यंत दोन तृतीयांश नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्याचं काम पूर्ण झालं आहे. 12 वर्षांवरील व्यक्तींची लोकसंख्या साधारण 1 कोटी 62 लाख एवढी आहे. त्यापैकी 32 लाखांपेक्षा अधिक नागरिक हे 60 वर्षं वयापेक्षा अधिक आहेत. नागरिकांनी लसीकरणाचा वेग वाढवावा असं आवाहन जर्मनीच्या आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.

First published:

Tags: Corona, Germany