मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Good News! आता केवळ लस नाही तर गोळ्या घेऊन बरा होणार COVID-19, या देशाने सर्वप्रथम दिली मान्यता

Good News! आता केवळ लस नाही तर गोळ्या घेऊन बरा होणार COVID-19, या देशाने सर्वप्रथम दिली मान्यता

कोरोनाशी लढा देताना आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी अँटीव्हायरल गोळ्या (Antiviral Tablets on Coronavirus) उपलब्ध झाल्या आहेत.

कोरोनाशी लढा देताना आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी अँटीव्हायरल गोळ्या (Antiviral Tablets on Coronavirus) उपलब्ध झाल्या आहेत.

कोरोनाशी लढा देताना आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी अँटीव्हायरल गोळ्या (Antiviral Tablets on Coronavirus) उपलब्ध झाल्या आहेत.

    गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूच्या (Coronavirus Pandemic) महाभयंकर आपत्तीशी लढणाऱ्या जनतेसाठी एक आनंदाची बातमी आहे. जगभरातील संशोधकांच्या अथक प्रयत्नांमुळे कोरोना विषाणूचा प्रतिबंध करणारी लस (Coronavirus Vaccination) उपलब्ध झाल्यानंतर सगळं जग आता यातून हळूहळू मुक्त होत आहे, मात्र लसीकरण करण्यातही अनेक अडचणी आहेत. तसंच कोरोनाच्या विषाणूचा धोका संपलेला नसल्यानं आणखी सहज, सोप्या उपचारांवर संशोधन सुरूच आहे. त्या आघाडीवर शास्त्रज्ञांनी आणखी एक यश मिळवलं आहे. आता कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी अँटीव्हायरल गोळ्या (Antiviral Tablets on Coronavirus) उपलब्ध झाल्या आहेत.

    कोरोना विषाणूचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये पहिल्या पाच देशांमध्ये असलेल्या ब्रिटनने (Britain-UK) या अँटीव्हायरल गोळीच्या वापरासाठी सर्वांत आधी मान्यता दिली आहे. अमेरिकेतील (USA) औषध निर्माती कंपनी मर्कने (Merck) या गोळ्यांची निर्मिती केली असून, मोलानुपिरावीर (Molanapuvir Antiviral Tablets on Corona) असं या गोळीचं नाव आहे. ब्रिटनने तब्बल 4 लाख 80 हजार गोळ्यांची पहिली ऑर्डर मर्कला दिली आहे. सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या कोविड-19 रूग्णांवर या गोळ्यांच्या सहाय्याने उपचार करण्यात येणार आहेत. ब्रिटनच्या मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीनं (MHRA) गुरुवारी ही माहिती दिली.

    हे वाचा-Corona Vaccination: पुण्यापाठोपाठ मुंबईतही आजपासून 4 दिवस लसीकरण बंद राहणार

    या मंजुरीनंतर बोलताना ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणाले,'आजचा दिवस आपल्या देशासाठी ऐतिहासिक आहे, कारण या अँटीव्हायरलला मान्यता देणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश आहे. या गोळ्यांमुळे कोविड-19चे उपचार घरच्या घरीच करणं सहज शक्य होणार आहे. कमी प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांसाठी या गोळ्या गेम चेंजर ठरतील.'

    मोलनुपिरावीर ही गोळी कोरोना विषाणूला त्याचे स्वरूप बदलण्यापासून रोखते आणि हा आजार हळूहळू कमी होतो. मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार, सौम्य ते मध्यम स्वरूपाचा कोविड -19 असलेल्या लोकांमध्ये रुग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी या गोळ्या सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे त्याच्या क्लिनिकल चाचण्यांमधून सिद्ध झालं आहे. कोविड-19ची लक्षणे दिसल्यानंतर सुरुवातीच्या काळातच या गोळ्या दिल्यास हा धोका कमी होतो तसंच रुग्ण लवकर बरा होत असल्याचं चाचण्यांमधून स्पष्ट झालं आहे. त्यामुळं हे औषध सुरुवातीच्या लक्षणांच्या पाच दिवसांच्या आत घेण्याची शिफारस मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीनं केली आहे.

    हे वाचा-कहर! जर्मनीत कोरोनाने तोडले सर्व रेकॉर्ड, 24 तासात अचानक वाढली रुग्णसंख्या

    लठ्ठपणा, मधुमेह , हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबंधित आजार असलेल्या लोकांना कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका अधिक गंभीर असतो. असा एखादा आजार असलेल्या लोकांसाठीही ही गोळी अत्यंत प्रभावी ठरत असल्यानं ती वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळं ब्रिटनने या गोळ्यांना तातडीनं मान्यता दिली असून, 20 ऑक्टोबर रोजी मर्क कंपनीकडे मोठी ऑर्डर नोंदवल्याचे जाहीर केले आहे.

    अमेरिका आणि युरोपियन महासंघातील देशांच्या औषध नियामकांनीही या औषधाचे मूल्यांकन सुरू केलं असून, अमेरिकेसह अनेक देशांशी मर्कने या औषधाबाबत करार केले आहेत. औषध नियामकांनी या औषधाला मंजुरी दिली तर मर्ककडून 1.7 दशलक्ष डोस खरेदी करण्यात येतील, असं अमेरिकेनं म्हटलं आहे.

    सध्या जगभरात मॉडर्ना, अस्ट्राझेनेका, फायझर, कोव्हॅक्सिन आदी लसींद्वारे कोरोनाविरुद्ध लसीकरण केले जात आहे. या गोळ्यांमुळे कदाचित कोरोनापासून बचाव करणं अधिक सोयीचं होईल.

    First published:
    top videos

      Tags: Britain, Corona vaccination, Corona vaccine cost, Coronavirus