मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /VIDEO : ख्रिस गेलनं मानले पंतप्रधान मोदींचे आभार, जाणून घ्या काय आहे कारण

VIDEO : ख्रिस गेलनं मानले पंतप्रधान मोदींचे आभार, जाणून घ्या काय आहे कारण

वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन ख्रिस गेल (Chris Gayle) याने  भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत.

वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन ख्रिस गेल (Chris Gayle) याने भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत.

वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन ख्रिस गेल (Chris Gayle) याने भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत.

मुंबई, 19 मार्च : संपूर्ण जगाला भेडसवणाऱ्या कोरोना व्हायरसवर (Coronavirus) वर मात करण्यासाठी भारतानं पुढाकार घेतला आहे.  भारताने मैत्री अभियानाच्या अंतर्गत (Vaccine Maitri) अनेक देशांना कोरोना वॅक्सिनचा (Corona Vaccine) पुरवठा केला आहे. भारताने काही दिवसांपूर्वी वेस्ट इंडिज बेटावरच्या जमैका अ‍ॅण्टिग्वा, बार्बाडोस, सेंट किट्स आणि नेविस, सेंट विंसेन्ट, सुरीनाम यासारख्या कॅरिकॉम देशांना कोरोना वॅक्सिनचा डोस दिला आहे. भारत सरकारच्या या चांगल्या कामाचं जगभरातून कौतुक होत आहे. वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन ख्रिस गेल (Chris Gayle) याने देखील याबद्दल भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आभार मानले आहेत.

काय म्हणाला गेल?

'आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारत सरकार आणि भारतीय लोकांचे जमैकाला व्हॅक्सिनची भेट दिल्याबद्दल आभार. इंडिया, आपली लवकरच भेट होईल, पुन्हा एकदा धन्यवाद आणि खूप खूप आभार.' असा खास व्हिडीओ शेअर करत ख्रिस गेल यांनी भारताचे आभार मानले आहेत.

वेस्ट इंडिजचे माजी कॅप्टन व्हिवियन रिचर्ड्स (Vivian Richards), रिची रिचर्डसन (Richie Richardson), तसंच जिमी अ‍ॅडम्स (Jimmy Adams)  यांनी देखील याबाबत भारत सरकार आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले  होते.

व्हिवियन रिचर्ड्स यांनी अ‍ॅण्टिग्वा आणि बार्बोडस देशांच्या नागरिकांच्या वतीने मोदींचे आभार मानले आहेत. 'भारताने आम्हाला कोरोना वॅक्सीनचा पुरवठा केला, त्यामुळे आमचे संबंध आणखी घट्ट झाले आहेत,' अशी भावना रिचर्ड्स यांनी व्यक्त केली आहे. तर रिची रिचर्ड्सन यांनी भारताने 40 हजार डोस पाठवल्याबद्दल भारत सरकार आणि मोदींचे आभार व्यक्त केले होते.

(हे वाचा- On This Day : भारताचा सर्वोच्च स्कोअर आणि 'तो' अविस्मरणीय कॅच VIDEO )

वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाचे संचालक जिमी अ‍ॅडम्स यांनी भारत सरकारच्या या अभियानामुळे कॅरिकॉम देशांना खूप फायदा होईल. मी जमैका देशवासियांच्या वतीने मोदींचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कॅरीकॉम हा 20 देशांचा समुह आहे. या समुहाची लोकसंख्या 1.6 कोटी आहे. भारताने यापूर्वी  मेैत्री अभियानाच्या अंतर्गत भूतान, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका या देशांना कोरोना वॅक्सिनचा पुरवठा केला आहे.

First published:

Tags: Chris gayle, Corona vaccine, Coronavirus, PM narendra modi, Vaccine, West indies, West indies player