wमुंबई, 19 मार्च : वेस्ट इंडिजमध्ये 2007 साली झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup 2007) स्पर्धेत भारताचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले होते. भारतीय क्रिकेट फॅन्सना त्या वर्ल्ड कपच्या आठवणी आजही नकोशा वाटतात. 2007 च्या वर्ल्ड कपमधील भारताचा एकमेव विजय आजच्या दिवशी (19 मार्च 2007) नोंदवला गेला होता. त्याचबरोबर वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात 400 रनचा टप्पा पार करणारी पहिली टीम म्हणून भारताची आजच्याच दिवशी नोंद झाली होती.
बांगलादेश विरुद्ध झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाचं वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान धोक्यात आले होते. त्यामुळे दुबळ्या बर्म्युडाला कमी समजून चालणार नव्हते. पहिल्यांदा बॅटींग करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात धक्कादायक झाली. दुसऱ्याच ओव्हरमध्ये रॉबीन उथ्थप्पाचा स्लिपमध्ये एक अविस्मरणीय कॅच ड्वेन लॅवरॉक (Dwayne Leverock) याने घेतला. लॅवरॉक स्लिपमध्ये फिल्डिंग करत होता. उथप्पानं मारलेला बॉल त्यानं एका हाताने पकडला. तो कॅच घेतल्यानंतर लॅवरॉक संपूर्ण मैदानात अगदी वर्ल्ड कप जिंकल्याच्या थाटात पळाला होता. लॅवरॉकचा तो कॅच आजही क्रिकेट फॅन्सच्या चांगलाच लक्षात आहे.
पहिल्या धक्क्यानंतर टीम इंडियाने बर्म्युडाला कोणतीही संधी दिली नाही. भारताकडून विरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) ने शतक (114) लगावले होते. त्याला सौरव गांगुली (89) आणि युवराज सिंग (83) याने चांगली साथ दिली.
2007 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय कोच ग्रेग चॅपेल यांच्या प्रयोगानुसार सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) मधल्या फळीत खेळत होता. बर्म्युडाविरुद्ध तर सचिननं सहाव्या क्रमांकावर बॅटींग केली. सचिननं 29 बॉलमध्ये 2 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं नाबात 57 रन काढले. सचिनच्या या फटकेबाजीमुळे भारतानं 5 आऊट 413 रन काढले. तो वर्ल्ड कप इतिहासातील आणि भारताच्या वन-डे क्रिकेटच्या इतिहासातील देखील तेंव्हाचा सर्वोच्च स्कोअर होता.
(हे वाचा : On This Day : दिनेश कार्तिकचा शेवटच्या बॉलवर सिक्स आणि टीम इंडियाला विजेतेपद! )
बर्म्युडाला 414 रनचं आव्हान पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 43.1 ओव्हरमध्ये 156 रनवर ऑल आऊट झाली. भारताने ती मॅच 257 रनच्या फरकानं दणदणीत जिंकली होती. आजच्या दिवसाची आणि या मॅचची आणखी एक आठवण म्हणजे भारताचा महान बॉलर अनिल कुंबळे (Anil Kumble) याच्या वन-डे काराकीर्दीमधील ती शेवटची मॅच ठरली. भारताच्या या चॅम्पियन बॉलरनं शेवटच्या मॅचमध्येही 38 रन देऊन 3 विकेट्स घेतल्या होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, On this Day, Sachin tendulkar, Sports, Virender sehwag