जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / No Vax, Pay Tax! लस न घेणाऱ्यांकडून ‘या’ देशात आकारला जाणार कर

No Vax, Pay Tax! लस न घेणाऱ्यांकडून ‘या’ देशात आकारला जाणार कर

No Vax, Pay Tax! लस न घेणाऱ्यांकडून ‘या’ देशात आकारला जाणार कर

ज्या व्यक्ती कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेणार नाहीत, त्यांच्याकडून वेगळा आरोग्य कर आकारला जाईल, असा निर्णय एका राज्यानं घेतला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कॅनडा, 12 जानेवारी: जे नागरिक (Citizens) लसीकरण (Vaccination) करून घेणार नाहीत, त्यांना अतिरिक्त आरोग्य कर (Additional Health Tax) आकारण्याचा निर्णय कॅनडातील (Canana) क्युबेक (Quebec) या राज्यानं घेतला आहे. लसीकरणाला नकार देणारे नागरिक हा आरोग्य व्यवस्थेवर येणारा एक मोठा ताण असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना भुर्दंड सहन करावा लागतो. असे नागरिक स्वतः लस घेत नसल्यामुळे ते असुरक्षित असतात आणि कोरोना विषाणूचा प्रसार होण्यासाठी अंतिमतः कारणीभूत ठरतात, असा दावा कॅनडाच्या आरोग्य संघटनेनं केला आहे.   काय आहे निर्णय लसीकरण न झालेल्या प्रत्येक व्यक्तीला यापुढे अतिरिक्त आरोग्य कर भरणं बंधनकारक करण्यात येणार आहे. या कायद्याचा मसुदा अद्याप जाहीर करण्यात आला नसला तरी लवकरच तो जाहीर केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लसीकरण करून न घेणाऱ्या नागरिकांकडून आकारला जाणारा कर हा $79.50 पेक्षा म्हणजेच भारतीय चलनात विचार केला तर साधारण 6 हजार रुपये असावा, असा विचार सरकारी पातळीवर सुरू आहे.   वादग्रस्त निर्णय लस न घेण्याचा अधिकार राज्यघटनेनं दिलेल्या व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असून अशा प्रकारचा कर लादणं अन्यायकारक असल्याचं अनेक नागरिकांचं म्हणणं आहे. या निर्णयाला कडाडून विरोध करण्याच्या तयारीत नागरिक आहेत. अगोदरच, लसीकरण न झालेल्या नागरिकांच्या प्रवासावर आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक बंधन लादण्यात आली आहेत. देशांतर्गत विमान प्रवासापासून ते आंतरराष्ट्रीय प्रवासापर्यंत अनेक बंधन ही लसीकरण न झालेल्या व्यक्तींवर लादण्यात आलेली आहेत. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून करही आकारणं चुकीचं असल्याचं सांगितलं जात आहे.   हे वाचा -

अपवादांना सवलत या निर्णयातून अपवादात्मक कारणांसाठी लसीकरण न करणाऱ्या व्यक्तींना वगळण्यात येणार आहे. अनेक व्यक्तींना लसीकरण न करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. अशा प्रकारे वैद्यकीय कारणांसाठी लसीकरण न करणाऱ्या व्यक्तींवर हा कर लादण्यात येणार नाही, असंही कॅनडातील या राज्यानं स्पष्ट केलं आहे. आता प्रत्यक्षात या कायद्याची औपचारिक घोषणा झाल्यानंतर काय प्रतिसाद जनतेतून येतो, ते पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. 

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात