Home /News /coronavirus-latest-news /

Corona Alert : या लोकांसाठी Omicron व्हेरिएंट घातक; WHO ने दिला इशारा

Corona Alert : या लोकांसाठी Omicron व्हेरिएंट घातक; WHO ने दिला इशारा

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

आरोग्य संघटनेनं म्हटलं, की ज्या लोकांनी कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतलेली नाही, त्यांच्यासाठी हा व्हेरिएंट अतिशय घातक आहे

    नवी दिल्ली 13 जानेवारी : कोरोनाच्या (Coronavirus) ओमायक्रॉन व्हेरिएंटबाबत (Omicron Variant) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा इशारा दिला आहे. आरोग्य संघटनेनं म्हटलं, की ज्या लोकांनी कोरोनाची लस (Corona Vaccine) घेतलेली नाही, त्यांच्यासाठी हा व्हेरिएंट अतिशय घातक आहे. हा व्हेरिएंट डेल्टाच्या तुलनेत कमी घातक असला, तरीही त्या लोकांसाठी ओमायक्रॉन धोकादायक ठरू शकतो, ज्यांचं लसीकरण झालेलं नाही. आरोग्य संघटनेनं त्या बातम्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे, ज्यात लोक ओमायक्रॉनला कमी घातक आणि सामान्य सर्दी-खोकला मानत आहेत. ओमिक्रॉनवर कोवॅक्सिन बुस्टर डोसचा नेमका काय परिणाम?; भारत बायोटेककडून मोठी अपडेट भारतातील निती आयोगाचे अध्यक्ष डॉ. व्ही के पॉल आरोग्य मंत्रालयाच्या साप्ताहिक पत्रकार परिषदेत म्हणाले, की ओमायक्रॉन व्हेरिएंटला हलक्यात घेऊ नका. लोकांमधील भीती कमी होण्याचं एक महत्त्वाचं कारण लसीकरण हेदेखील आहे. लसीकरणामुळे या व्हेरिएंटपासून सुरक्षा मिळत असल्याने लोक याला कमी घातक समजत आहेत. मात्र, काही देशांमध्ये या व्हेरिएंट आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात प्रभावित केल्या आहेत. देशातील कोरोना स्थितीबद्दल बोलताना हेल्थ मिनिस्ट्रीने सांगितलं की देशातील 300 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यापेक्षा जास्त आहे. यात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरातमधील जिल्ह्यांचा समावेश आहे. बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड विकली पॉझिटिव्हिटी रेट ऑफ हाय रिस्क सिटीची यादी जारी केली. मागील आठवड्यात यात बंगालमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक 60.29 होता. जो दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईपेक्षाही जास्त होता. RTPCR रिपोर्ट निगेटिव्ह आलाय तरीपण कोरोनाची लक्षणं आहेत; हे कारण असू शकते आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोलकातामध्ये सर्वाधिक विकली पॉझिटिव्हिटी रेट आहे. सरकारी डाटानुसार, 5 ते 12 जानेवारीदरम्यान मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट 26.95 टक्के, बंगळुरू 12.29 टक्के, ठाणे 31.54 टक्के, चेन्नई 23.32 टक्के, पुणे 23.4 टक्के आणि कोलकातामध्ये 60.29 टक्के होता. तर दिल्लीमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 23 टक्क्याच्या आसपास होता.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates

    पुढील बातम्या