जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Delta Plus नं वाढवली चिंता; केंद्रानं 8 राज्यांना पत्र लिहून केलं अलर्ट, दिल्या महत्त्वाच्या सूचना

Delta Plus नं वाढवली चिंता; केंद्रानं 8 राज्यांना पत्र लिहून केलं अलर्ट, दिल्या महत्त्वाच्या सूचना

ब्लड गृप ‘ए’ आणि ‘बी‘  असण्यांना कोरोना संक्रमाणाचा धोका जास्त आहे.

ब्लड गृप ‘ए’ आणि ‘बी‘ असण्यांना कोरोना संक्रमाणाचा धोका जास्त आहे.

आतापर्यंत विविध जिल्ह्यात एकूण 48 संक्रमित आढळून आले आहेत. याच कारणामुळे चिंतित असलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 8 राज्यांना पत्र लिहून त्यांना जीनोम सिक्वेंसींगसाठी (Genome Sequencing) नमुने पाठवण्यास सांगितले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 26 जून : कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Coronavirus) आटोक्यात येत असली, तरीही चिंता अद्यापही कायम आहे. भारतात कोरोनाचा आणखी एक नवा व्हेरियंट आढळून आला आहे. कोरोना व्हायरसचा (Coronavirus) नवा डेल्टा प्लस व्हेरियंट (Delta Plus Variant) भारतात वेगात पसरत आहे. आतापर्यंत विविध जिल्ह्यात एकूण 48 संक्रमित आढळून आले आहेत. याच कारणामुळे चिंतित असलेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 8 राज्यांना पत्र लिहून त्यांना जीनोम सिक्वेंसींगसाठी (Genome Sequencing) नमुने पाठवण्यास सांगितले आहे. Delta Plus मुळे राज्यात निर्बंध; मुंबई लेवल 3 मध्ये, लोकल ट्रेनबाबत काय निर्णय? या आठ राज्यांमध्ये आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, जम्मू काश्मीर, पंजाब, कर्नाटक, राजस्थान आणि तामिळनाडू यांची नावे समाविष्ट आहेत. केंद्राने या राज्यांना जिल्हा व गटांमध्ये त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास सांगितले. यामध्ये गर्दी व मेळाव्यांना प्रतिबंध करणे, मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या करणे, त्वरित ट्रेसिंग करणं तसेच प्राधान्याच्या आधारावर व्हॅक्सिन कव्हरेज यासारख्या सूचनांचा समावेश आहे. केंद्राने म्हटलं आहे, की चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांचे पुरेसे नमुने तातडीने INSACOG च्या नियुक्त प्रयोगशाळांमध्ये जीनोम सिक्वन्सिंगसाठी पाठवावेत. Corona vaccine न घेणं पडलं महागात? लसीकरण न झालेल्या 98% कोरोनाग्रस्तांचा मृत्यू आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी देखील या वेगवेगळ्या राज्यांना पत्र लिहून अशा जागांचा किंवा जिल्ह्यांचा उल्लेख केला आहे, ज्या ठिकाणी डेल्टा प्लस व्हेरियंट आढळला आहे. याचा परिणाम सांगताना म्हटलं गेलं आहे, की या व्हेरिएंटची लक्षणं लक्षात घेऊन अधिक सावधगिरी बाळगणे आणि कठोर पावले उचलणे आवश्यक आहे. तामिळनाडूतील मदुराई, कांचीपुरम आणि चेन्नई, राजस्थानमधील बीकानेर जिल्हा, कर्नाटकातील म्हैसूर, पंजाबमधील पटियाला आणि लुधियाना, जम्मू-काश्मीरमधील कटरा, हरियाणामधील फरीदाबाद, गुजरातमधील सूरत आणि आंध्र प्रदेशमधील तिरुपतीमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातही डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका लक्षात घेता अनेक ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात