Home /News /coronavirus-latest-news /

Corona vaccine न घेण्याची चूक पडली महागात? लसीकरण न झालेल्या 98% नागरिकांनी कोरोनामुळे गमावला जीव

Corona vaccine न घेण्याची चूक पडली महागात? लसीकरण न झालेल्या 98% नागरिकांनी कोरोनामुळे गमावला जीव

कोरोना लस घेतल्यास कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूला रोखता येऊ शकतं.

वॉशिंग्टन, 25 जून :  जगभरात कोरोना लसीकरणाला (Corona vaccination) वेग आला आहे. भारतातही कोरोना लसीकरणाला 5 महिने उलटून गेले आहेत. आता व्यापक स्तरावर लसीकरण राबवलं जात आहे. पण तरी अनेकांच्या मनात कोरोना लशीच्या (Corona vaccine) प्रभावाबाबत आणि सुरक्षिततेबाबत प्रश्न कायम आहेत. किती तरी लोक कोरोना लस घ्यायला घाबरत आहेत आणि कोरोना लस घेणं टाळत आहेत. अशात कोरोना लस किती महत्त्वाची आहे, हेच स्पष्ट करणारी अशी ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कोरोना लस अनेकांसाठी संजीवनी (Corona vaccine life saving) ठरली आहे. तर ज्यांनी कोरोना लस घेतली (Corona infected people died who not taking corona vaccine) नाही, त्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेतील कोरोनाबाबतचा एक अहवाल जारी करण्यात आला आहे. अमेरिकेत कोरोनामुळे ज्यांचा मृत्यू झाला, त्यांनी लस (Vaccine) घेतलेली नव्हती किंवा लस घेण्यास नकार दिल्याचं स्पष्ट झालं आहे. वृत्त एजन्सी असोसिएटेड प्रेसने (Associated Press) अमेरिकी सरकारच्या डेटाचे विश्लेषण केलं. एपीने सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (CDC) आकडेवारीचा अभ्यास केला. एपीने (AP) मे महिन्यातील डेटाचे विश्लेषण केलं होतं. लसीकरणानंतर संसर्ग आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचे 45 राज्यांमध्ये दिसून आले आहे कोविड-19 चा संसर्ग झालेले आणि रुग्णालयात भरती असलेल्या 8.53 लाख लोकांपैकी केवळ 1200 लोकांना कोरोनाचा दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याचं दिसून आलं आहे. या सर्व लोकांनी पहिल्यांदा कोरोनामुक्त झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच लस घेतली होती. याचाच अर्थ लसीकरणानंतर (Vaccination) संसर्गाचा दर केवळ 0.1 टक्के आहे. मे महिन्यात अमेरिकेत कोरोनामुळे 18 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी लस घेऊनही मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या केवळ 150 होती. याचा अर्थ लसीकरणामुळे मृत्यूदर कमी झाला असून तो 0.8 टक्के आहे. लवकरात लवकर सर्व नागरिकांनी लस घेतल्यास हा आकडा शून्यावर येऊ शकतो,  ही बाब यातून स्पष्ट झाली आहे. हे वाचा - Pregnant महिलांनाही कोरोना लस द्या; मोदी सरकारने जारी केल्या गाइडलाइन्स या महिन्याच्या सुरुवातीला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाचे माजी सल्लागार अँडी स्लेविट यांनी सांगितलं होतं की, अमेरिकेत कोविड-19 चा संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेले 98 ते 99 टक्के नागरिक असे होते की ज्यांनी लस घेतलेली नाही. 68 वर्षीय व्यावसायिक रॉस बैग्ने यांनी फेब्रुवारीच्या सुरुवातीला लस घेणं अपेक्षित होते. परंतु, त्यांनी लस घेतली नाही. परिणामी 4 जूनला कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला. ते 3 आठवडे रुग्णालयात भरती होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी झालं. त्यांना गिळण्यास त्रास होत होता. शेवटी त्यांना स्ट्रोक आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांची बहिण कॅरेन यांनी सांगितलं की रॉस हे कधीच घराबाहेर गेले नाहीत. त्यामुळे आपल्याला संसर्ग होणार नाही असा त्यांचा समज होता. परंतु त्यांना संसर्ग झाला. त्यामुळे माझी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर लस घ्यावी. सीडीसीचे संचालक डॉ रोशेल वॉलेन्सकी यांनी सांगितलं की, सध्या उपलब्ध असलेल्या लशी इतक्या प्रभावी आहेत की ज्या कोरोनामुळे होणारे मृत्यू नक्कीच रोखू शकतात. ज्या लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, ही बाब दुःखदायक आहे परंतु, त्यांनी लस घेतली असती तर अशी वेळ त्यांच्यावर नक्कीच आली नसती. अमेरिकेत यावर्षी जानेवारी महिन्यातील मध्यावधीत कोरोनामुळे प्रतिदिन 3400 रुग्णांचा मृत्यू होत होता. त्यावेळी ही सर्वोच्च स्थिती होती. लसीकरण अभियानामुळे हे प्रमाण एका महिन्यात लक्षणीय घटलं. एकीकडे जगात लशीचा तुटवडा भासत होता, परंतु दुसरीकडे अमेरिकेत मात्र पुरेशा प्रमाणात लशी उपलब्ध होत्या. सीडीसीने दिलेल्या माहितीनुसार, 12 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या ज्या पात्र व्यक्ती होत्या त्यापैकी 63 टक्के लोकांनी लशीचा एक डोस (Dose) घेतला आहे तर 53 टक्के लोकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. हे वाचा - निवृत्ती म्हणजे विश्रांती नव्हे; परिचारिकेने कोरोना महासाथीत उभा केला नवा आदर्श तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांना मृत्यूपासून वाचवलं जाऊ शकतं, तेच लोक लस घेण्यास नकार देत आहेत. सिएटल मधील युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधील हेल्थ मॅट्रिक्स सायन्सेसचे प्राध्यापक अली मोकदाद यांनी सांगितलं की, हिवाळ्यानंतर देशातील मृतांचा आकडा पुन्हा वाढून तो प्रतिदिन 1000 होऊ शकतो. अरकंसास हे राज्य अमेरिकेतील सर्वात कमी लसीकरण झालेलं राज्य आहे. येथील 33 टक्के नागरिकांचे लसीकरण झालं आहे. त्यामुळे संसर्ग, रुग्णालयात भरती आणि मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. सिएटल येथील किंग काऊंटीमधील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या (Public Health Department) निरीक्षणानुसार मागील 60 दिवसांत कोरोनामुळे केवळ 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या रुग्णांचे लसीकरण पूर्ण झालं होतं. मात्र 62 असे रुग्ण होते की ज्यांनी लस घेतलेली नव्हती. किंग काऊंटी मधील व्हॅक्सिनेशन आऊटरीच कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. मार्क डेल बेकारो यांनी सांगितलं की ज्या लोकांचा मृत्यू झाला, ते कोणाचे तरी नातेवाईक, वडील, आजोबा किंवा मित्र होते. जर लस घेतली असती तर त्यांना मृत्यू टाळता आला असता. सेंट लुईसचे डॉ. एलेक्स गार्जा यांनी सांगितलं की, येथे कोरोना संसर्गामुळे 90 टक्के लोक रुग्णालयात भरती झाले. या लोकांनी लस घेतलेली नव्हती. त्यातील काही जणांनी ही चूक मान्यही केली असून त्यांना आता याबाबत पश्चाताप होत आहे. रुग्णालयात भरती झालेले लोक आता आपल्या आप्तस्वकीय, मित्रांना लस घेण्याचा सल्ला देत आहेत. जॉर्ज वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीचे संसर्ग रोग तज्ज्ञ डेव्हिड मायकल्स यांनी सांगितले की लस न घेतल्याने मृत्यू होत असून याला आता लोक घाबरत आहेत. त्यामुळे लसीकरण करण्याकडे कल वाढला आहे. अनेक लोकांना लसीकरणासाठी सुट्टी दिली जात आहे. कारण लसीकरणानंतर काही साईडइफेक्ट झाला तर त्यातून बरे होऊन ते पुन्हा कामाला येऊ शकतील.
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus, Covid-19

पुढील बातम्या