Home /News /mumbai /

Delta Plus मुळे राज्यात नवे निर्बंध; मुंबईत काय नियम आणि लोकल ट्रेनबाबत काय निर्णय?

Delta Plus मुळे राज्यात नवे निर्बंध; मुंबईत काय नियम आणि लोकल ट्रेनबाबत काय निर्णय?

ब्रेक द चेन मिशन अंतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुंबईत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

मुंबई, 25 जून: कोविड 19च्या डेल्टा (Delta variant of Coronavirus) आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे (Delta Plus Variant of Coronavirus) राज्यभरात नव्याने निर्बंध आणि मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत. ठाणे जिल्ह्याचाही समावेश आता लेवल 2 मधून लेवल 3मध्ये झाला आहे. त्याचप्रमाणे आता मुंबई महानगरपालिकेने (BMC) निर्बंधांबाबत नव्याने आदेश जारी केले आहेत. बृहन्ममुंबई महानगरपालिका हद्दीत मागील 2 आठवड्यातील कोविड 19 चा पॉझिटिव्हिटी दर 3.96 टक्के इतका असून ऑक्सिजन बेड व्याप्तीचा सरासरी दर 26.04 टक्के इतका आहे. राज्य सरकारने 25 जून 2021 रोजी जारी केलेल्या आदेशानुसार बृहन्ममुंबई महानगरपालिका लेवल 3 मध्ये येत असून लेवल तीनचे निर्बंध मुंबईत लागू असणार आहेत. Delta Plus मुळे ठाणे जिल्ह्यात कठोर निर्बंध; वाचा काय सुरू काय बंद कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करण्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन कोविड प्रसाराला आळा घालण्यासाठी मुबंई मनपा हद्दीत लेवल 3 चे निर्बंध लागू करण्याचे आदेश 18 जून 2021 रोजी लागू केले होते ते आता पुढील आदेशापर्यंत जसेच्या तसे लागू असणार आहेत. दरम्यान, नागरिकांना सोशल डिस्टंन्सिंग, मास्कचा वापर करणे अनिवार्य असणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास अथवा विरोध करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नवे निर्बंध हे 28 जून 2021 पासून लागू असणार आहेत. सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू होणार? मुंबईचा समावेश लेवल 3 मध्ये होत असल्याने सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेन सुरू करण्यात येणार नाहीये. त्यामुळे आता सुरू असल्याप्रमाणे केवल अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकलची सेवा सुरू राहणार आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BMC, Coronavirus, Mumbai

पुढील बातम्या